Nashik Political News: भाजपचा बालेकिल्ला भेदण्याचे आव्हान!

MLA Seema Hire
MLA Seema Hireesakal

Nashik Political News : मनसेच्या इंजिनाला ‘ब्रेक’ लावत भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी २०१४ पासून नाशिक पश्चिम हा मतदारसंघ बांधून ठेवला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत (२०१९) माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली.

पण त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. आता राष्ट्रवादीत अजित पवार आणि शरद पवार असे उघड दोन गट निर्माण झाल्याने या मतदारसंघात ‘दादां’ ना मानणारे नेते जास्त दिसतात. डॉ. हिरेंच्या सोशल मीडियावर अजित पवारांचे फोटो झळकत असल्याने त्यांनी ‘दादां’ सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला दिसतो.

तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, शिंदे गटाचे प्रवीण तिदमे यांच्यासह मनसेचे दिलीप दातीर, ‘सीपीआयएम’ चे डी. एल. कराड या नेत्यांसमोर भाजपचा बालेकिल्ला भेदण्याचे प्रमुख आव्हान असणार आहे. (challenge to to lose BJP seema hire by mns ncp cogress Nashik Political News)

नाशिकमधील प्रामुख्याने एमआयडीसी, सिडको, सातपूर भागातील मतदारांचा कौल असलेल्या नाशिक पश्चिम या मतदारसंघात ३ लाख ९८ हजार मतदार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत २ लाख १९ हजार मतदारांनी लोकशाहीचा हक्क बजावत मतदान केले.

त्यात भाजपच्या सीमा हिरे यांना ७८ हजार मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे ६८ हजार मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले. मूळात अपूर्व हिरे हे भाजपमध्ये असताना विधानपरिषदेचे आमदार होते.

त्यांनी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी केली आणि भाजपला तगडे आव्हान दिले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दुफळी निर्माण झालेली दिसत असली तरी येथील कार्यकर्ते हे दोन गटांमध्ये विखुरलेले दिसतात. एक म्हणजे

मविप्र समाज शिक्षण संस्थेचे माजी संचालक नाना महाले यांना मानणारा आणि दुसरा अपूर्व हिरेंचा. नाना महाले यांनी अद्याप कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. पण अपूर्व हिरे हे अजित दादांच्या गटात गेल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

MLA Seema Hire
Nashik Political: भाजपमध्ये चुरस अन्‌ वरचष्माही! शिवसेना-राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडे चेहराच नाही

या मतदारसंघात चार वेळा नगरसेवक राहिलेले राजेंद्र महाले, बाळासाहेब गिते, कृष्णा काळे, तात्या भामरे, मकरंद सोमवंशी, अक्षय पाटील, हर्षल चव्हाण, सुनील जगताप, किरण शिंदे, मदन जमदाडे, रोहित पाटील, विशाल डोखे, संतोष सोनपठारे, अमोल पाटील, वैभव देवरे, राहुल कमानकर, सचिन कमानकर आदी नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.

२०१९ निवडणूक चित्र

आ. सीमा हिरे (भाजप) : ७८०४१ मते

डॉ.अपूर्व हिरे (राष्ट्रवादी) : ६८२९५ मते

दिलीप दातीर मनसे (मनसे) : २५५०१ मते

डॉ. डी. एल. कराड (सीपीआयएम): २२६५७ मते

विलास शिंदे (अपक्ष) : १६४२९ मते

MLA Seema Hire
Saroj Ahire : साहेब प्रचारात उतरले, तर ताईंची होणार पंचाईत!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com