Nashik News : चेंबर सफाई अडकली हद्दवादात; इंदिरानगर नाशिक पूर्व विभागात की सिडको विभागात?

Work in progress to clear blocked drainage.
Work in progress to clear blocked drainage.esakal

इंदिरानगर (जि. नाशिक) : एरवी पोलिस (Police) ठाण्यांच्या हद्दीमुळे गुन्हा नेमका कुठे नोंदवायचा यावरून वाद होताना ऐकले जाते. (Chamber cleaning stuck in delimitation dispute in Indiranagar East or cidco division nashik news)

इंदिरानगर भागात मात्र चेंबर साफ करण्यासाठी चेंबर नाशिक पूर्व विभागात आहे की सिडको विभागात आहे, याची चर्चा सुरू झाल्याने तक्रार करणाऱ्या नागरी समस्या निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप यांच्यासह नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

वडाळा -पाथर्डी या मुख्य रस्त्यावर सुदर्शन मंगल कार्यालय आणि नभांगन लॉन्स या भागात असणाऱ्या वनवैभव तसेच साक्षी कुंज येथील दोन चेंबर गेल्या अनेक दिवसांपासून तुंबलेले होते. यातील गाळ बाहेर पडल्याने मोठी दुर्गंधी सुटली होती. याबाबत तक्रार केली असता कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

त्यामुळे जगझाप यांनी सिडको विभागाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना याबाबत कळविले. तेव्हा त्यांनी नभांगनच्या बाजूचे असलेले चेंबर हे पूर्व विभागात येते. शिवाय आमच्याकडे ही बाब सफाई करणारे वाहन नादुरुस्त आहे. त्यामुळे त्यांना फोन करून बोलावून घ्या आणि त्यांच्याकडून करून घ्या, असे सांगितले. त्यांनी दोघा जणांना पाठवले खरे मात्र त्यांच्यासोबत पारंपारिक गज आदी साहित्य होते.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Work in progress to clear blocked drainage.
Nashik Crime News : चालकानेच लांबविला ट्रकमधील माल

जे तुंबलेले ड्रेनेज साफ करण्यासाठी जवळपास अपुरे होते. चेंबरदेखील हद्दीत अडकल्याने आता ही साफसफाई होइल की नाही याबाबत चर्चा सुरू झाल्या. अखेर माजी नगरसेवक ॲड श्याम बडोदे यांनीदेखील यात लक्ष घातले.

त्यांनीदेखील मग आरोग्य विभागाला कळविल्यानंतर दुपारी चारनंतर पूर्व किंवा सिडको नाही तर सातपूर विभागाच्या साफसफाई करणाऱ्या वाहनाद्वारे या दोनसह सात चेंबर साफ करण्यात आल्याचे समजते.

पूर्व विभाग आणि सिडको विभाग येथील संबंधित वाहने नादुरुस्त असल्याने सातपूर येथील वाहनावर हे चेंबर दुरुस्त करण्याची वेळ आल्याने नागरिकांना हसावे की रडावे, असा प्रश्न पडला होता. महापालिकेने किमान आरोग्य विषयक समस्यांबाबत तरी या प्रकारे हद्दीचा वाद न आणता आरोग्याच्या दृष्टीने अशी कामे प्राधान्याने पूर्ण करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Work in progress to clear blocked drainage.
Nashik Crime News : लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com