Chandanpuri Khanderao Mandir : चंदनपुरीच्या खंडेराव मंदिर संवर्धनास प्रारंभ

Chandanpuri khanderao maharaj mandir Organic chemical conservation work of temple was taken up  nashik news
Chandanpuri khanderao maharaj mandir Organic chemical conservation work of temple was taken up nashik newsesakal

मालेगाव (जि. नाशिक) : बानूबाईच्या चंदनपुरीतील श्री खंडेराव महाराजांचे पुरातन मंदिर आहे. श्री खंडेरायाच्या जेजुरीनंतर चंदनपुरी येथील स्थानाला मोठे महत्त्व आहे. (Chandanpuri khanderao maharaj mandir Organic chemical conservation work of temple was taken up nashik news)

नैसर्गिक परिस्थितीमुळे पुरातन वस्तूंना इजा पोचत असल्याने जय मल्हार ट्रस्टच्या पुढाकाराने मंदिराचे ऑर्गेनिक रासायनिक संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील गौतम सरनाईक व त्यांचे सहकारी संवर्धनाचे काम करणार आहेत.

चंदनपुरी येथील श्री खंडेरायाचे मंदिर पाचशे ते सातशे वर्षापूर्वीचे आहे. नैसर्गिक परिस्थितीमुळे पुरातन वस्तूंना इजा पोचत आहे. मंदिराला काही ठिकाणी नुकसान झाल्याने जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी ऑर्गेनिक रासायनिक संवर्धनाचा निर्णय घेतला.

यासाठी त्यांनी अनेक वर्षापासून शासन दरबारी पाठपुरावा केला. नुकत्याच झालेल्या यात्रोत्सव काळात शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी चंदनपुरीला भेट दिली होती. पुरातत्त्व विभागाने परवानगी दिल्यानंतर मंदिर संवर्धनाचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Chandanpuri khanderao maharaj mandir Organic chemical conservation work of temple was taken up  nashik news
International Women's Day : कष्टकरी महिलांच्या ‘धडपडी’चा सन्मान! अनोख्या सन्मानाने भगिनी भावनाविवश

सावंतवाडी येथील गौतम सरनाईक हे काम करणार आहेत. त्यांनी आतापर्यंत उज्जैन येथील महाकालेश्‍वर मंदिर, चेन्नई येथील जगन्नाथ मंदिर याखेरीज उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तमिळनाडू आदींसह देशातील विविध पुरातन मंदिरांचे ऑर्गेनिक रासायनिक संवर्धन केले आहे.

जिल्हाध्यक्ष श्री. निकम म्हणाले, की मंदिर संवर्धन आवश्‍यक होते. नैसर्गिक बदलांमुळे पुरातन वस्तुंची पडझड होते. ऑर्गेनिक रासायनिक संवर्धन केल्यानंतर मंदिरावरील हळद (भंडारा) हाताने पुसला जाईल. जय मल्हार ट्रस्टने चांगले काम हाती घेतले आहे.

श्री. सरनाईक म्हणाले, की ऑर्गेनिक रासायनिक संवर्धनासाठी लागणारे साहित्य आम्ही स्वत: तयार करतो. यात जे घटक मंदिराला चालणार नाहीत, त्यांचा समावेश केला जात नाही. संवर्धनाने वर्ष नाही तर अनेक पिढ्यानपिढ्या मंदिर व पुरातन वस्तू मजबूत राहतात. साधारण वर्षभर हे काम चालेल. काम सुरु असताना काही प्रमाणात भाविकांची गैरसोय होवू शकते.

"नैसर्गिक बदलांमुळे मंदिराला काही ठिकाणी हानी पोचली आहे. मंदिर संवर्धनाच्या कामाला पुरातत्त्व विभागाने परवानगी दिल्यानंतर ते सुरु करण्यात आले. ट्रस्टचे उत्पन्न मर्यादित आहे. मल्हार भक्तांनी या कामासाठी मदत करावी." - सतीश पाटील, अध्यक्ष, जय मल्हार ट्रस्ट, चंदनपुर

Chandanpuri khanderao maharaj mandir Organic chemical conservation work of temple was taken up  nashik news
Womens Day 2023 : सामान्य महिलाच पोस्टाच्या खऱ्या ग्राहक!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com