International Women's Day : कष्टकरी महिलांच्या ‘धडपडी’चा सन्मान! अनोख्या सन्मानाने भगिनी भावनाविवश

Hard working women honored by Dhadpad Manch on the occasion of International Women's Day.
Hard working women honored by Dhadpad Manch on the occasion of International Women's Day.esakal

येवला (जि. नाशिक) : येथील सेवाभावी संस्था धडपड मंचतर्फे विविध क्षेत्रातील कष्टकरी महिलांना गुलाबपुष्प व साडी चोळीचे वाटप करत महिलांना फेटा बांधून सन्मान करण्यात आला. या अनोख्या सन्मानाने उपस्थित महिलांच्या डोळ्यांतून नकळत आनंदाश्रू तरळले.

आपलीही कोणीतरी आठवण करीत आहे, हे पाहून त्यांना भावनावेग आवरला नाही. जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र अनेक कार्यक्रम झाले, त्यात महिलांचे कौतुक करीत त्यांचा सत्कार झाला, मात्र या कार्यक्रमातील सत्कारार्थी होत्या, समाजाच्या पटलावर कधीही विचारपूस न केल्या जाणाऱ्या कष्टकरी महिला, त्यामुळे या कार्यक्रमांची उंची आणखी वाढत गेली... (Honoring struggle of hardworking women on International Womens Day at yeola nashik news)

समाजातील कष्टकरी महिलांचाही सन्मान व्हावा, या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोटमगाव देवीचे येथील कष्टकरी व स्वावलंबी महिलांचा सन्मान हा त्यांच्या वस्तीवर जाऊन करण्यात आला.

अध्यक्षस्थानी नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर उपस्थित होते. महिला अहोरात्र कष्ट करतात. त्यांच्या अंगी सहनशक्ती जास्त असते. महिलांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेताना स्वतःच्याही आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगत धडपड मंचच्या स्तुत्य उपक्रमाचे मुख्याधिकारी मुतकेकर यांनी कौतुक केले.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Hard working women honored by Dhadpad Manch on the occasion of International Women's Day.
Success Story : निफाडच्या अनुष्का गोसावीची आयआयटी खरगपूरसाठी झाली निवड

उन्हातान्हात काबाडकष्ट करणाऱ्या या महिलांना सन्मान करताना नक्कीच आनंद होत असल्याचे धडपड मंचचे अध्यक्ष प्रभाकर झळके यांनी सांगितले. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काबाडकष्ट करणाऱ्या महिलांचा सन्मान नक्कीच व्हायला पाहिजे असे सामाजिक कार्यकर्ते नारायणमामा शिंदे यांनी सांगितले. स्त्रीच्या प्रेमाची, कर्तृत्वाची, त्यागाची जाणीव कुटुंबातील प्रत्येकाने मनात जपली पाहिजे असे किशोर सोनवणे यांनी सांगितले.

प्रा. दत्तात्रय नागडेकर यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत खंदारे यांनी आभार मानले. डॉ. सागर बोळे, उपसरपंच प्रवीण मोरे, नामदेव माळी, नवनाथ मोरे, गणेश मोरे, लक्ष्मण सोनवणे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. मयूर पारवे, दीपक कासले, मंगेश पैठणकर, गोपी दाणी, मुकेश लचके, शुभम सुकासे, दत्ता कोटमे, वरद लचके यांनी परिश्रम केले.

Hard working women honored by Dhadpad Manch on the occasion of International Women's Day.
Nashik News : नागरी सुविधांची वानवा अन् पुरस्कारांचा गोडवा! पुरस्कारप्राप्त शिरसाठे गावाची दैना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com