Chandwad
sakal
चांदवड: स्वयंभू राजराजेश्वरी रेणुकामातेच्या सहाव्या माळीनिमित्त शनिवारी (२७) देवस्थानात पहाटेपासूनच हजारो भाविकांची मांदियाळी चरणी होती. पहाटेच्या मंगल आरतीपासूनच दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी रांग लागली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, तसेच परराज्यातून आलेल्या हजारो भक्तांनी दिवसभरात दर्शन घेऊन माता रेणुकेच्या चरणी आपली मनोकामना व्यक्त केली.