चांदोरी: गोदावरीला आलेल्या महापुरात बुधवारी (ता. २०) रात्री चांदोरी ग्रामपालिकेचा पाच हजार लिटर क्षमतेचा पाण्याचा टँकर वाहून गेला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. वाहून गेलेला टँकर शुक्रवारी (ता. २२) खानगाव थडी येथे नदीपात्रात ग्रामस्थांना आढळून आला. त्या टॅंकरची झालेली अवस्था पाहून पाण्याच्या प्रवाहाचा वेग किती होता, याचा अंदाज येतो.