esakal | नाशिकमध्ये काम करुनही नकारात्मक रिपोर्टिंग - चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil

नाशिकमध्ये काम करुनही नकारात्मक रिपोर्टिंग - चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : नाशिक महापालिकेत भाजपने विकासकाम केली आहे. मात्र महापालिकेतील प्रसारमाध्यमातील रिपोर्टिंग निगेटीव्ह होते. याची कबुली देतांना प्रत्येक हजार मतदारांमागे ३० कार्यकर्त्यांची नियुक्त्या केली आहे. नगरसेवकांत मतभेद असू शकतात पण नाराजी नाही. असा दावा करीत, चार वर्षात भाजपने केलेली जाहीरनाम्यातील विकासकाम लोकांपर्यत पोहोचविले जातील. असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. (chandrakant patil said that despite development work in nashik reporting was negative)

पाटील म्हणाले की, नाशिकमध्ये भाजपच्या महापालिकेतील सत्ताकाळात अनेक कामे झाली मात्र त्याविषयी रिर्पोटिंग नकारात्मक होत अशी खंत आहे. त्याविषयी पक्षात विचारमंथन सुरु आहे. सत्ताकाळात जाहीरनाम्यातील काय काय कामे झाली. ते लोकांपर्यत पोहोचविण्याचा मोठा उपक्रम राबविला जाणार आहे. नगरसेवकांमध्ये संघटना म्हणून नाराजी नाही. रक्तामासांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असतात. भाजप तर मोठा राजकीय पक्ष आहे. त्यात, नगरसेवकांमध्ये मतभेद असू शकतात. पण निवडणूकांवर परिणाम होईल. अशा प्रकारची कुठलेही नाराजी पक्षात नाही. पक्षाचे संघटनात्मक बांधणी भक्कम आहे. कोरोनाच्या दोन लाटेतील लॉकडाउनमुळे जनजीवण विस्कळित झाल संघटनात्मक पातळीवर भाजपने या काळात मास्क वाटपापासून तर कोवीड सेंटर उभारणीपर्यंत विविध कामे केली. प्रत्येक १ हजार मतदारांमागे ३० कार्यकर्त्यांच पक्षाच संघटन आहे. आगामी काळात काही नवीन पद निर्माण केले जातील.

नाशिक दौऱ्यावरील पाटील यांनी भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री जयकुमार रावल, प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर आदी व्यासपिठावर होते.

हेही वाचा: राज ठाकरे आश्वासक नेते; त्यांची पन्नास भाषणे ऐकणार : चंद्रकांत पाटील

नियम सांभाळून आंदोलन

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राजकिय पक्षांनी गर्दी जमविण्याचे कार्यक्रम घेउ नयेत. अशा प्रशासनाच्या सुचना असल्याविषयी ते म्हणाले की, कोरोनाचे नियम सगळ्यांनी पाळलेच पाहिजे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनाही कोरोनाचे निर्बंध पाळूनच आंदोलन करण्याचे आवाहान केले आहे. राज्यात १ कोटी ७० लाख मतदान मिळते तो पक्ष सत्तेत येतो त्यादृष्ट्रीने भाजपची तयारी सुरु आहे. महादेव जानकर, सदाभाउ खोत यांच्यासारख्या लहान लहान वोट बॅकांचे पक्षही भाजपसोबत आहे. राज ठाकरेंच्या मनसेची परप्रांतीयांविषयी भूमिका बदलली तर त्यांच्या पक्षाचा विचार होउ शकतो. वारी ही महाराष्ट्राची समृध्द परंपरा आहे. दोन वर्षापासून वारी होत नसल्याने निदान कळसाचे तरी दर्शन होउ द्या. ही महाराष्ट्रातील वारकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यात, गैर काही नाही.

chandrakant patil said that despite development work in nashik reporting was negative

हेही वाचा: मोबाईल नसतानाही सुनयना विद्यालयात तिसरी; बिकट परिस्थितीतून मिळवले यश

loading image