esakal | मोबाईल नसतानाही सुनयना विद्यालयात तिसरी; बिकट परिस्थितीतून मिळवले यश
sakal

बोलून बातमी शोधा

Sunaina Deshmukh

मोबाईल नसतानाही सुनयना विद्यालयात तिसरी; बिकट परिस्थितीतून मिळवले यश

sakal_logo
By
दीपक देशमुख

झोडगे (जि. नाशिक) : कोरोना महामारीने सगळ्या जगाला वेठीस धरले आहे. या संकटाच्या काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, या अडचणीत ऑनलाइन शिक्षणासाठी अँड्रॉइड मोबाईल नसताना देखील सुनयना देशमुखने यशाला गवसणी घातली. चिखलओहोळ येथील देशमुख विद्यालयातून परीक्षा देत ८७.४० टक्के गुण मिळवून तृतीय येण्याचा मान मिळविला. (sunaina deshmukh passed ssc exam in the absence of phone for online education)

झोडगे येथील विद्यार्थिनी सुनयना हिचे वडील रवींद्र देशमुख यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे सर्वसी जबाबदारी आईने स्वीकारली व शेतमजुरी करून आपल्या मुलीला चांगले शिक्षण दिले. घरची परिस्थिती बेताची असल्याने कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षणामुळे सुनयनाकडे कोणताही अँड्रॉइड फोन नव्हता. फोन घेण्याइतपत पैसेही नव्हते. पण, सुनयनाने जिद्द न हारता आपल्या मैत्रिणीकडे जाऊन ऑनलाइन अभ्यास पूर्ण केला. सुनयनाचे घर शाळेपासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे तिला शाळेतील शिक्षकाचे प्रत्यक्ष चांगले मार्गदर्शन मिळाले. घरकाम, शेतीकाम व अभ्यास यांचा ताळमेळ साधत तिने अभ्यास केला. ८७.४० टक्के गुण मिळवून ती विद्यालयात तिसरी आली. घरच्या बिकट परिस्थितीची जाणीव असल्यामुळे तिच्या या यशाने आई-वडिलांच्या डोळ्यांत पाणी आले. सुनयनाला विज्ञान शाखेतून सनदी अधिकारी होऊन देशसेवा करायची आहे.

तिच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन संदीप देशमुख, मुख्याध्यापक हंसराज देसाई, पर्यवेक्षक विश्‍वास दापूरकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

(sunaina deshmukh passed ssc exam in the absence of phone for online education)

हेही वाचा: 'घाबरु नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे', राज ठाकरेंचं पदाधिकाऱ्यास आश्वासन

loading image