esakal | नाशिकमध्ये चंद्रकांत पाटलांच्या ‘डीनर डिप्लोमसी’ साठी पदाधिकाऱ्यांची फिल्डिंग! शक्तीप्रदर्शन करण्याचे प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil

चंद्रकांत पाटील यांच्या ‘डीनर डिप्लोमसी’ साठी फिल्डिंग!

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील १७ व १८ जुलैला नाशिक दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात विविध पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी भेट देऊन डीनर डिप्लोमसीचा अवलंब करणार आहे. दरम्यान, त्यांच्या डीनर डिप्लोमसीमुळे निवासस्थानी भेट देण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांकडून फिल्डिंग लावली जात असून, यातून शक्तिप्रदर्शन करण्याचे प्रयत्न होत आहेत. (Chandrakant-Patil-tour-Nashik-political-news-jpd93)

चंद्रकांत पाटील यांच्या ‘डीनर डिप्लोमसी’साठी पदधिकाऱ्यांची फिल्डिंग

चंद्रकांत पाटील शनिवारी (ता. १७) सकाळी साडेसात ते साडेआठदरम्यान गंगापूर रोडवरील शंकराचार्य संकुल येथे संघ समन्वय शाखेला भेट देतील. त्यानंतर पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक होईल. सकाळी अकराला भाजप शहर उपाध्यक्ष व चिटणीसांची बैठक पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात होईल. दुपारी बाराला शहराध्यक्ष व सरचिटणीस यांच्यासमवेत बैठक होईल. त्यानंतर दहा मंडल अध्यक्ष, विविध मोर्चे, आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा होईल. सायंकाळी शहरातील तीनही आमदार, तसेच प्रमुख ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. रात्री नऊला माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानी भेट देतील. १८ जुलैला महापौर सतीश कुलकर्णी यांच्या निवासस्थानी भेट देतील. दुपारी बाराला माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधतील. दुपारी पक्षाच्या प्रमुख शहर पदाधिकाऱ्यांशी संवाद, सायंकाळी ग्रामीण पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

हेही वाचा: पोलिसांच्या सतर्कतेमुळे थांबला अल्पवयीन मुलीचा साखरपुडा

हेही वाचा: सिडकोत मनसेला सक्षम नेतृत्वाची गरज; ‘भोपळा’ फोडण्याचे आव्हान

loading image