esakal | पोलिसांच्या सतर्कतेमुळे थांबला अल्पवयीन मुलीचा साखरपुडा
sakal

बोलून बातमी शोधा

nashik news

पोलिसांच्या सतर्कतेमुळे थांबला अल्पवयीन मुलीचा साखरपुडा

sakal_logo
By
युनूस शेख

जुने नाशिक : अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती नियंत्रण कक्ष वरून भद्रकाली पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली. विवाह नसून साखरपुडा होत असल्याचे समजले. पोलिसांनी कारवाई करत साखरपुड्याचा कार्यक्रम रद्द केला. (vigilance of the police stopped the engagement of minor girl)

जुने नाशिक भागात गुरुवारी (ता. १५) सकाळी अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची तक्रार पोलिस नियंत्रण कक्षास प्राप्त झाली. त्यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात माहिती कळवत कारवाईच्या सूचना केल्या. पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. माहिती घेतली असता साखरपुडा होत असल्याची माहिती कळाली. पोलिसांनी सोहळा रद्द करण्यास सांगून मुला- मुलीच्या पालकांना ठाण्यात बोलावून घेतले. त्यांना समजपत्र देण्यात आले. अल्पवयीन मुलीचे अशाप्रकारे सोहळे करण्यास कायदेशीर बंदी असल्याचे सांगून त्यांना सोहळा रद्द करण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानंतर मुला- मुलीच्या कुटुंबीयांनीदेखील साखरपुडा सोहळा रद्द करत परतीचा मार्ग घेतला. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, दोन दिवसापूर्वी हिंगोली येथील ओढा गावातदेखील अशाच प्रकारे अल्पवयीन मुलीचा विवाह केला जात असल्याची माहिती नाशिक शहरातील सामाजिक कार्यकर्त्या भावना हगवणे यांना प्राप्त झाली. त्यांनी तत्काळ हिंगोली येथील ओढा पोलिस ठाण्याशी संपर्क साधत येथील निरीक्षक मुंडे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी घटनास्थळी दाखल होत विवाह सोहळा रद्द केला. मुला-मुलींच्या पालकांना समजपत्र देऊन कारवाई केली. अशाप्रकारे सामाजिक कार्यकर्त्या, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलीचा साखरपुडा, तसेच विवाह अशा दोन घटना थांबवून बालविवाह प्रथेस आळा घालण्यात आला.

(vigilance of the police stopped the engagement of minor girl)

हेही वाचा: नाशिक जिल्‍ह्यात दिवसभरात १६२ रुग्ण कोरोना बाधित

loading image