
माळेगाव : महाराष्ट्रात ऊस दराची स्पर्धा कायम रहावी. यासाठी सहकार क्षेत्रातील माळेगाव साखर कारखाना विरोधकांच्या ताब्यात असावा, अशी मनोमन इच्छा बहुमतांशी शेतकऱ्यांची होती. परंतु पैसे घेवून लाचार झालेल्या काही सभासदांनी चुकीचा निर्णय घेतला आणि आमचा पराभव झाला. परंतु सात हजार पेक्षा अधिक प्रमाणिक सभासदांनी या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला. त्या पाठिंब्याच्या जोरावर यापुढेही सभासदांच्या भल्यासाठी लढत राहणार आहे. खासगी कारखान्यांच्या तुलनेत माळेगावचे विस्तारिकरण करून अधिकाधिक ऊस गाळपासाठी आमचा आग्रह धरणार. सर्वाधिक ऊस दराची परंपरा कायम ठेवण्यासाठी माळेगावचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरूद्ध रस्त्यावर उतरणार आहे, असा इशारा विरोधक चंद्रराव तावरे यांनी दिला.