Chandrasekhar Bawankule : सातपूर बसस्थानक महत्त्वाचे केंद्र ठरेल : चंद्रशेखर बावनकुळे

Chandrasekhar Bawankule, Seema Hire and BJP office bearers at the inauguration of the bus station.
Chandrasekhar Bawankule, Seema Hire and BJP office bearers at the inauguration of the bus station. esakal

Chandrasekhar Bawankule Nashik : सातपूर येथे बांधलेले अद्ययावत असे बसस्थानक हे उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी व्यक्त केला. (Chandrashekhar Bawankule statement about satpur bus stand nashik news)

आमदार सीमा हिरे यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या सातपूर येथील अद्ययावत आणि विश्रांतीगृहासह सर्व सुविधांनी युक्त असे सातपूर बसस्थानक, अशोकनगर येथील भाजी मार्केटचा लोकार्पण सोहळा फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोलताशांच्या गजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी ते बोलत होते.

आमदार सीमा हिरे यांनी नाशिक पश्चिम मतदार संघात मोठया प्रमाणात विकास निधी खेचून आणला. सभागृहात त्या सातत्याने प्रत्येक घटकांच्या भल्याचा विचार करून त्यांच्यासाठी सरकारकडे गाऱ्हाणे मांडत असतात. आमदारकीचा वापर त्या जनसेवेसाठी करीत असतात. त्यांच्या कुटुंबीयांनी सुद्धा गरिबांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले आहे, असेही बावनकुळे पुढे म्हणाले.

सीमा हिरे यांनी गरिबांना मोठ्या प्रमाणात घरे बांधून देण्याचे काम हाती घ्यावे, असा सल्ला देतानाच बावनकुळे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिवसेना- भाजप सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Chandrasekhar Bawankule, Seema Hire and BJP office bearers at the inauguration of the bus station.
NMC River Cleaning : बीज स्वरूप बाहेर काढल्यास पानवेलींचा प्रश्‍न मिटणार!

व्यासपीठावर प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आमदार ॲड. राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, विजय चौधरी, विक्रांत पाटील, शहराध्यक्ष गिरीश पालवे, विजय साने, अजित चव्हाण, माजी सभागृहनेते दिनकर पाटील, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, इंदू नागरे, छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे, रवी अनासपुरे, अविनाश पाटील, जगन पाटील, भगवान काकड, जगन पाटील, बाळासाहेब पाटील, भगवान दोंदे, राकेश दोंदे, रामहरी संभेराव आदी उपस्थित होते.

सातपूर येथे भव्य आणि सर्व सोयींनी युक्त असे बसस्थानक बांधावे, अशी मागणी सातपूरवासीयांची अनेक वर्षांपासून होती आणि आज ते स्वप्न साकार झाले आणि त्याचे लोकार्पण होत असल्याने आनंद वाटतो, असे सांगून सीमा हिरे यांनी आपल्या प्रास्ताविकात सातपूरमध्ये केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली.

कार्यक्रमास राजेंद्र फड, गणेश बोलकर, दिलीप गिरासे, रवींद्र धिवरे, माधुरी बोलकर, राजेश दराडे, किसनराव विधाते, उदय रिकीबे, प्रकाश निगळ, शिवाजी मटाले, वर्षा भालेराव, अनिल मटाले, भालेराव, दीक्षा लोंढे, रोहिणी नायडू, सलीम शेख, कैलास अहिरे, अलका अहिरे, भीमानंद काळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Chandrasekhar Bawankule, Seema Hire and BJP office bearers at the inauguration of the bus station.
NMC Water Reduction : मंगळवारी पाणीकपातबाबत अंतिम निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com