Chandu Chavan
sakal
नाशिक रोड: लष्करातून मला असंविधानकरीत्या बडतर्फे करण्यात आले असले तरी माझा लढा लष्करावरविरुद्ध नव्हे तर भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध आहे. माझी लष्करावार आजही अढळ श्रद्धा आहे. त्यामुळेच माझ्या दोन्ही मुलांना मी लष्करातच भरती करणार, असे स्पष्ट प्रतिपादन चंदू चव्हाण यांनी केले. सरकारने मला पाकच्या कैदेतून सोडवले. त्यासाठी मनापासून आभार. पण भ्रष्ट व्यवस्थेच्या अन्यायामुळे मला जिवंत राहूनही मेल्यासारखे वाटत आहे. अशी खंत त्यांनी व्यक्त केली.