नाशिक- भारतीय सैन्यातून बडतर्फ करण्यात आलेल्या चंदू चव्हाण याला देवळाली कॅम्प पोलिसांनी अटक केली असून, शुक्रवारी (ता. ११) त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी त्याने गोंधळ घालत पोलिसांवर गंभीर आरोप केले. न्यायालयाने त्याला १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.