गणूर (ता. चांदवड): मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोग्रस येथे नाशिक येथून चांदवडच्या दिशेने भरधाव येणाऱ्या ‘छोटा हत्ती’ (एमएच १५ एचएच ३५५९) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरून येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या मुलांच्या घोळक्याला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अक्षय रमेश महाले (वय १५, रा. भुत्याने) याचा जागीच मृत्यू झाला; तर सोग्रस-मालसाने परिसरातील ११ विद्यार्थी व महिला जखमी झाली.