flowers
sakal
काजीसांगवी: अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदवड तालुक्यातील शेतकरी खरीप पिकाच्या हंगामात कांदा पीकापाठोपाठ आधुनिक झेंडु पिकाकडे वळाला आहे. चार महिन्यात शेतकऱ्यांना लखपती करणारे हे पीक शेतकऱ्यासाठी आवडीचे बनले आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी झेंडू पिकाची रंगबेरंगी फुलशेती फुलवली आहे.