Municipal Election
sakal
गणूर: चांदवड नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराचे राजकीय वातावरण आता खऱ्या अर्थाने तापू लागले आहे. दहा प्रभागांमधून २० नगरसेवक आणि एक लोकनियुक्त नगराध्यक्ष या निवडणुकीतून मिळणार असून, नगराध्यक्षपदाची उमेदवारी नेमकी कुणाला, या प्रश्नाभोवती अनेक तर्क–वितर्क रंगू लागले आहेत; तर इच्छुकांकडून मात्र नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.