nashik police ayuktalay
sakal
नाशिक: शासकीय कार्यालयांमध्ये नोकरीत नियुक्तीसाठी उमेदवारास चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देणे सक्तीचे आहेच; परंतु गेल्या काही वर्षांपासून खासगी आस्थापनांकडूनही नोकरीवर नियुक्ती करण्यासाठी उमेदवारांकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक होत आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांत शहरातील सुमारे २० हजार नागरिकांनी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेतले आहे. यात बहुतांश विद्यार्थी आणि नोकरीसाठीच्या अर्जांचा समावेश अधिक आहे. एकंदरीत या आकडेवारीवरून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी कल वाढत असल्याचे दिसते.