Latest Marathi News | शहरात 15 ठिकाणी Charging Point; Smart City कंपनीच्या माध्यमातून स्टेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electric vehicle charging station

शहरात 15 ठिकाणी Charging Point; Smart City कंपनीच्या माध्यमातून स्टेशन

नाशिक : शहरात बॅटरीवर चालणाऱ्या अर्थात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने व इलेक्ट्रिक वाहने पर्यावरणपूरक असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनेदेखील शहरात १५ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल (ईव्ही) चार्जिंग पॉइंट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून ‘ईव्ही’ स्टेशन उभारले जाणार आहे. (Charging Point at 15 locations in city Station through Smart City Company Nashik Latest Marathi News)

शहरात पारंपारिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने शून्य कार्बन उत्सर्जन धोरण अवलंबले आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान दिले जाते. नाशिक शहराचा विचार करता शहरात मोठ्या प्रमाणात पारंपारिक इंधनावर चालणारी वाहने धावत आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये पेट्रोल व डिझेलचे भाव सातत्याने वाढत असल्याने नागरिकांचा कल आपोआप परवडणाऱ्या व पर्यावरणपूरक ‘इलेक्ट्रिक व्हेईकल’ कडे वाढला. इलेक्ट्रिक व्हेईकल आर्थिकदृष्ट्या परवडणार तर आहेच त्या व्यतिरिक्त पर्यावरणपूरक व चालविण्यासदेखील सोपे आहे. त्यामुळे दिवसागणिक इलेक्ट्रिक व्हेईकलची संख्या शहरात वाढत आहे.

चारचाकी वाहनांमध्येदेखील इलेक्ट्रिकल व्हेईकल आल्याने त्याचा वापर वाढत आहे. इलेक्ट्रिक व्हेईकलची संख्या वाढत असली तरी चार्जिंग स्टेशन अद्यापही अस्तित्वात नाही. या संदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी महापालिकेकडे विचारणा केली असता, महापालिकेने भविष्यात १५ चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याचे लेखी कळविले.

हेही वाचा: Bogus Medical Certificate Case : ‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्यांचीही होणार चौकशी

येथे होणार चार्जिंग स्टेशन

- राजीव गांधी भवन मुख्यालय

- नाशिक पश्चिम विभागीय कार्यालय

- पूर्व विभागीय कार्यालय

- सिडको विभागीय कार्यालय

- नाशिक रोड विभागीय कार्यालय

- सातपूर विभागीय कार्यालय

- पंचवटी विभागीय कार्यालय

- नाशिक रोड बिटको रुग्णालय

- डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय कठडा

- महाकवी कालिदास कलामंदिर

- इच्छामणी मंगल कार्यालय समोरील बाजू उपनगर

- नाशिक पुणे महामार्गावरील बोधले नगरच्या आरटीओ कॉलनीत

- लेखानगर सिडको

- प्रमोद महाजन उद्यान गंगापूर रोड

- कृषी नगर जॉगिंग ट्रॅक

"शहरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या प्रमाणात चार्जिंग स्टेशनदेखील वाढणे गरजेचे आहे. ही जबाबदारी महापालिकेने पार पाडणे अपेक्षित असताना ते होत नाही. मात्र, महापालिकेने लेखी दिल्यानुसार लवकरच चार्जिंग स्टेशन तयार होतील."

- हेमंत गोडसे, खासदार

हेही वाचा: B.E., B.Tech., इंटिग्रेटेड अभ्यासक्रम प्रवेशासाठी 4 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत

Web Title: Charging Point At 15 Locations In City Station Through Smart City Company Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..