Admission News
Admission Newsesakal

B.E., B.Tech., इंटिग्रेटेड अभ्यासक्रम प्रवेशासाठी 4 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत

नाशिक : अभियांत्रिकी शाखेतील पदवी अभ्यासक्रम (बी.ई/बी.टेक.) यासह पदवी-पदव्‍युत्तर पदवी (इंटिग्रेटेड कोर्स) या अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाच्‍या प्रक्रियेला सुरवात झालेली आहे. सीईटी सेलतर्फे बुधवारी (ता.२१) प्रवेश वेळापत्रक जाहीर केले आहे.

त्‍यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागासाठी ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रे पडताळणीसाठी ४ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत दिलेली आहे. कॅप राउंडच्‍या प्रक्रियेला १३ ऑक्‍टोबरपासून सुरवात होईल. (Deadline for BE B Tech Integrated Course Admission is 4th October Nashik Latest Marathi News)

एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्‍यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा लागून होती. बुधवारी ही प्रतीक्षा संपली असून, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशाचे वेळापत्रक सीईटी सेलतर्फे जाहीर केलेले आहे. चार वर्षे कालावधीच्‍या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम (बीई/बी.टेक) यासह पाच वर्षे कालावधीचा पदवी-पदव्‍युत्तर संयुक्‍त अभ्यासक्रम (बीई-एमई इंटिग्रेटेड) या अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्षात प्रवेशासाठी हे वेळापत्रक आहे.

इच्‍छुक विद्यार्थ्यांना ४ ऑक्‍टोबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करताना आवश्‍यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. याच कालावधीत कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करायची आहे. सुविधा केंद्र (एफसी सेंटर) येथून कागदपत्रांची पडताळणी करून घेता येणार आहे. सध्याच्‍या वेळापत्रकानुसार तीन कॅप राउंडच्‍या तारखा जाहीर केलेल्‍या आहेत. नोव्‍हेंबर महिन्‍यापर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरु राहणार आहे.

सध्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर झाले असले तरी अन्‍य पदवी, पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकाची संबंधित विद्यार्थ्यांना प्रतीक्षा कायम आहे. येत्‍या आठवड्याभरात टप्‍याटप्‍याने वेळापत्रक जाहीर केले जाण्याचा अंदाज आहे.

Admission News
Nashik : ZP कर्मचाऱ्यांनी फोडले तोतयाचे बिंग

१ नोव्‍हेंबरपासून अध्ययन सुरू

सीईटी सेलच्‍या वेळापत्रकानुसार तीन कॅप राउंडची प्रक्रिया झाल्‍यानंतर एक नोव्‍हेंबरपासून अध्ययन प्रक्रियेला सुरवात केली जाईल. तर शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्‍या प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया १७ नोव्‍हेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक

प्रवेश प्रक्रियेत सहभागासाठी नोंदणी------------४ ऑक्‍टोबरपर्यंत

तात्‍पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणार------------७ ऑक्‍टोबर

यादीबाबत हरकती, तक्रारींची मुदत--------------८ ते १० ऑक्‍टोबर

अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार--------------१२ ऑक्‍टोबर

पहिल्‍या कॅप राउंडसाठी नोंदणी------------------१३ ते १५ ऑक्‍टोबर

पहिल्‍या कॅप राउंडसाठी निवड यादी--------------१८ ऑक्‍टोबर

प्रवेश निश्‍चितीसाठी मुदत-----------------------१९ ते २१ ऑक्‍टोबर

Admission News
Bogus Medical Certificate Case : ‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्यांचीही होणार चौकशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com