नोकरीच्या आमिषाने तरुणीकडून बेरोजगार तरुणांची फसवणूक | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fake identity card of an unemployed youth created in the name of a district hospital.

नोकरीच्या आमिषाने तरुणीकडून बेरोजगार तरुणांची फसवणूक

जुने नाशिक : शासकीय, खासगी रुग्णालयांत नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरुणीकडून तरुणांची फसवणूक झाल्याचा प्रकार बुधवारी (ता. २०) उघडकीस आला.

काही तरुणांकडून या तरुणीविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी तरुणांकडून करण्यात आली आहे. (Cheating of unemployed youth by young woman with lure of job nashik fraud crime Latest Marathi News)

जुने नाशिक परिसरातील तरुणीने शासकीय, खासगी रुग्णालयांत नोकरीचे आमिष दाखवत तरुणांकडून लाखो रुपये उकळले आहे. पैसे घेऊनही नोकरी लावण्यास टाळाटाळ करत असल्याने तरुणीने फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या संदर्भात शाहरुख रफिक पठाण व त्याच्या दोन भावंडांनी तरुणीविरुद्ध सोमवारी (ता. १८) भद्रकाली पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केला. तरुणीने शाहरुख पठाण यांच्यासह अन्य बेरोजगार तरुणांना जिल्हा रुग्णालय, महापालिकेचे बिटको रुग्णालय, तसेच इगतपुरी येथील एका संस्थेच्या रुग्णालयात नोकरीचे आमिष दाखवले.

काहींना रुग्णालयात नेऊन तेथील कर्मचाऱ्यांशी भेट घालून दिली. शिवाय जिल्हा रुग्णालयाचे विनासही, शिक्का असलेले बनावट ओळखपत्र तयार करून त्यांच्याकडून लाखोंची रक्कम लुटली. मुदत दिल्याप्रमाणे तिने त्यांना नोकरीस लावले नाही. तरुणांनी तिच्याशी संपर्क केला असता, पुढच्या आठवड्यात तुमचे काम नक्की होईल, असे सांगत टाळाटाळ केली.

हेही वाचा: जि.प. आणि पं. स. निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादी हरकती 25 जुलैपर्यंत

अनेक महिने उलटूनही नोकरी न मिळाल्याने तरुणांना संशय आला. त्यांनी तिच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. तिने अद्याप पैसे परत केले नाही. काही दिवसांपासून ती कुठेतरी निघून गेल्याची माहिती तरुणांना मिळाली.

त्यांनी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता, तुमच्यामुळे आमची मुलगी घर सोडून निघून गेली, तुमच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा दम दिल्याचे तक्रारदार शाहरुख यांनी सांगितले. तरुणीसह तिच्या सहकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तरुणांकडून करण्यात आली आहे.

सुमारे १५ ते २० तरुणांची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती तक्रारदाराकडून देण्यात आली.

"तरुणीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता, उलट त्यांच्याकडून आम्हास धमकावले जात आहे. पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल करत आम्हाला न्याय द्यावा."

- शाहरुख पठाण, तक्रारदार

"पोलिसांनी तिच्यावर कारवाई करत आम्हाला आमची रक्कम परत मिळून द्यावी. तिच्यावर योग्य ती कारवाई करावी. जेणेकरून ती इतरांबरोबर पुन्हा, असे प्रकार करणार नाही."

- साकिब कुरेशी

हेही वाचा: अनोळखी मृतदेह विहिरीत आढळला; म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील घटना

Web Title: Cheating Of Unemployed Youth By Young Woman With Lure Of Job Nashik Fraud Crime Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..