
Sakal Impact : प्रवाशांनो..पळवाटा शोधाल तर पडेल महागात!
झोडगे (जि.नाशिक) : कोरोना महामारी (corona virus) रोखण्यासाठी जिल्हाबंदी घालण्यात आली असली तरी अनेक प्रवासी पळवाटा शोधून प्रवास करत असल्याचे वृत्त बुधवारी (ता. ५) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. राष्ट्रीय महामार्गावरील (national highway) नाशिक-धुळे सरहद्दीवर दोन्ही जिल्ह्यांतील पोलिस प्रशासनातर्फे चेक पोस्ट (check post) उभारण्यात आले असून, महामार्गावरील प्रवाशांची तपासणी केली जात आहे. (national highway check post from police)
.
हेही वाचा: ग्राउंड रिपोर्ट : कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकांना जिल्हा चेक पोस्टवर ड्युटी ?
पळवाटांवरही आता पोलिसांकडून चेक पोस्ट
अनेक गावांचे रस्ते राष्ट्रीय महामार्गाशी जोडले गेल्याने प्रवासी छुप्या रस्त्यांचा वापर करत आहेत. ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने अशा मार्गांवरून प्रवास करणाऱ्यांची कडक तपासणी सुरू केल्याने प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. अनेकांनी रस्त्यावरच माघारी फिरविल्याचे चित्र दिसून येत. वाढत्या उन्हामुळे पहाटे व रात्री उशिरापर्यंत प्रवास करण्याचा प्रयत्न करत असलेल्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने पोलिस यंत्रणेला अधिक सजग राहून तपासणी करावी लागत आहे. ग्रामीण भागातील अनेक प्रवासी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पांढरा रुमाल बांधून प्रवास करताना चेक पोस्टवरील पोलिस पाहताच डोक्यावरील रुमाल तोंडावर लावून पोलिस तसासणीपासून सर्रास पळ काढताना दिसत आहेत
हेही वाचा: खाद्यतेलात महागाईचा तडका! महिलांचे आर्थिक नियोजन बिघडले
Web Title: Check Post From Police On Highway Nashik Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..