World record: शेफ विष्णू मनोहर नोंदविणार जागतिक विक्रम! नाशिककरांना खाऊ घालणार मोफत 4 हजार किलो पौष्टिक भगर

Chef Vishnu Manohar
Chef Vishnu Manoharesakal

नाशिक : प्रख्यात शेफ विष्णू मनोहर हे नाशिकमध्ये आपला सोळावा जागतिक विक्रम करणार असून, १२ फेब्रुवारीला महाराष्ट्र मिलेट्स मिशन, नाशिक भगर मिल असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात ते तब्बल ४ हजार किलो भगर बनवून नाशिककरांना खाऊ घालणार आहेत.

आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड्समधील मिलेट्स प्रकारातील हे एकमेव रेकॉर्ड होणार असून, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्ससह विविध ठिकाणी याची नोंद घेतली जाणार असल्याची माहिती सेफ विष्णू मनोहर यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Chef Vishnu Manohar will set world record Free 4 thousand kg of nutritious bhagar fed to people of Nashik news)

या वेळी नाशिक भगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र छोरीया, उमेश वैश्य, अशोक सांखला, पारस सांखला, जिल्हा कृषी अधिकारी सोनवणे आदी उपस्थित होते. युनेस्कोने २०२३ हे वर्ष मिलेट्स (तृणधान्य) वर्ष म्हणून नुकतेच जाहीर केले आहे. नाशिकची भगर भारतात प्रसिद्ध आहे. तिचा अधिक प्रसार व्हावा म्हणून नाशिक भगर मिल असोसिएशनने पुढाकार घेऊन महाराष्ट्र मिलेट्स मिशन यांच्या सहकार्याने प्रख्यात सेफ विष्णू मनोहर यांच्या या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे .

आतापर्यंत विविध पंधरा रेकॉर्ड

एकाच वेळी ४ हजार किलोपेक्षा जास्त भगर एकाच कढईत शिजवून ती मोफत वाटण्यात येणार आहे. हे तृणधान्य प्रकारातील जागतिक रेकॉर्ड होणार आहे. सेफ विष्णू मनोहर यांनी आतापर्यंत विविध पंधरा रेकॉर्ड केले आहे.

सोळाव्या रेकार्डसाठी ४ हजार किलो भगर एकावेळी शिजविण्यासाठी नागपूर येथे खास कढई तयार करण्यात आली आहे. त्या कढईचे वजन सुमारे दीड हजार किलो असून, १० बाय १० फूट व्यास आणि ५ फूट उंच आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Chef Vishnu Manohar
Youth in Addiction : पिंपळगावची तरुणाई व्यसनांच्या विळख्यात! पालकांना सतावतेय चिंता

त्यासाठी ३ प्रकारचे २२ किलो वजनाचे मोठे चमचे ही तयार करण्यात आले आहेत. १२ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता भगर शिजवण्याच्या या उपक्रमास सुरवात होईल. साडेदहापर्यंत भगर शिजवून तयार होईल. यानंतर ती नागरिकांना मोफत वाटण्यात येणार आहे. तसेच नाशिकमधील अनाथालय, वृद्धाश्रम, हॉस्पिटलमध्येही रुग्णांना भगर दिली जाणार आहे.

अशी असेल खास रेसिपी

भगर बनविण्यासाठी विष्णू मनोहर यांनी खास रेसिपी तयार केली असून, त्यासाठी भगर ४०० किलो , बटाटा २५० किलो, मीठ ३७ किलो, तेल १२५ किलो, पाणी २७०० लिटर , जिरा १२ किलो, शेंगदाणे १०० किलो, शेंगदाणे कूट १२५ किलो, दही ४०० किलो, ५०किलो, तूप १०० किलो, दूध १०० लिटर हे साहित्य वापरून ४ हजार किलो भगर तयार होणार आहे.

Chef Vishnu Manohar
SAKAL Exclusive | भारत व्‍हावे Diabetes Care Capital! : पद्मश्री डॉ. शशांक जोशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com