नाशिक- ‘मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याआधी मलाच कृषी खात्याची ऑफर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली होती,’ असा गौप्यस्फोट अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केला. भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर कृषी खाते माझ्याकडे यावे, यासाठी उपमुख्यमंत्री पवार आग्रही होते, असे भुजबळांनी सांगत कोकाटेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.