esakal | महाआघाडीत बिघाडी; छगन भुजबळ-सेना आमदारामध्ये जुंपली
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal and Sena MLA Suhas Kande

महाआघाडीत बिघाडी; छगन भुजबळ-सेना आमदारामध्ये जुंपली

sakal_logo
By
सुधीर काकडे

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या मोठी शाब्दिक चकमक झाल्याचे समोर आले आहे. आपत्कालीन निधी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या मुद्यावरुन पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सुहास कांदे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. नाशिकमधील नांदगावमध्ये हा प्रकार घडला आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ हे नुकसान पाहणी दौऱ्यावर होते. नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर त्यांची लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक होती. या बैठकीला शिवसेना आमदार सुहास कांदे हे सुद्धा उपस्थित होते. या दोघांमध्ये नुकसानीच्या तातडीच्या मदतीवरुन शाब्दिक चकमक सुरु झाली. शब्दाने शब्द वाढत गेला आणि दोघेही मोठ मोठ्या आवाजात भांडू लागले.

हेही वाचा: मंत्र्यांचे दौरे सुरु, पण मदत कधी मिळणार? ;पाहा व्हिडिओ

सुहास कांदे यांनी सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी जशी मदत दिली होती, तशीच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली. त्यावेळी छगन भुजबळ यांनीही त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. मात्र तातडीच्या मदतीवरुन दोघांमध्ये सुरु झालेली बाचाबाची, बाहेर पडेपर्यंत थांबलीच नाही. सुहास कांदे यांच्या समर्थकांनी त्याचवेळी घोषणाबाजीही केली.

loading image
go to top