(कॉमन आवृत्तीत टुडे पान एकला आज पावपेज जाहिरात आहे...कृपया फोटोसह बातमी ही कॉमनला घ्यावी...)
पान-३ वर
-----------------
YEO26B27188
नाशिक : ज्येष्ठ साहित्यिक गुलजार यांच्या साहित्यकृती भेट देऊन मंत्री छगन भुजबळ यांचा सत्कार करताना राष्ट्रवादी डॉक्टरचे तालुकाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय. सोबत डॉ. संजय जाधव आदी.
-----------------
पुष्पगुच्छाऐवजी गुलजारांच्या साहित्याची भेट
डॉ. क्षत्रियांकडून भुजबळांचा वाढदिवस ःस्थानिक पदाधिकाऱ्यांकडून वह्या, साहित्य
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१५ : वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी पुष्पगुच्छ न देता पुस्तकांची भेट देण्याची संकल्पना राबवत येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. यानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक गुलजार यांच्या काव्यसंग्रहाची भेट देऊन शुभेच्छा दिल्या. दरम्यान येवल्यातील हजारो पदाधिकाऱ्यांनी नाशिक येथे मंत्री भुजबळ यांना वह्या व इतर साहित्य भेट देत साधेपणाने वाढदिवस साजरा केला.
मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस यंदा साधेपणाने साजरा करण्यात आला. नाशिक येथील भुजबळ फार्म येथे येवल्यातून शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून वह्या, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य भेट देण्यावर हितचिंतक व कार्यकर्त्यांनी भर दिला. डॉ. क्षत्रिय यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना काव्यसंग्रह प्रदान केला. नेहमीच्या पुष्पगुच्छांपेक्षा साहित्याची निवड करत त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांना वैचारिक आणि साहित्यिक मूल्यांची जोड दिली. ही आगळीवेगळी भेट स्वीकारताना भुजबळांनाही स्मितहास्य आवरता आले नाही.
डॉ. चंद्रशेखर म्हणाले,‘ मंत्री भुजबळ यांना वाचनाची आणि साहित्याची आवड आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देताना गुलजार यांचा काव्यसंग्रह भेट दिला. यापुढेही गोरगरीब रुग्णसेवेसह पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबविले जातील असेही त्यांनी सांगितले.
१६-१
पदाधिकाऱ्यांकडून अभीष्टचिंतन
नाशिक येथील भुजबळ फार्म हाऊसवर मंत्री छगन भुजबळ यांना शुभेच्छा देण्यासाठी येवल्यातील हजारो पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. सहकार नेते अंबादास बनकर, माजी सभापती संभाजीराजे पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, जलसिंचन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष भगवान ठोंबरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक गायकवाड, गटनेते दीपक लोणारी, नगरसेवक शंकर मांजरे, प्रवीण बनकर, बाजार समितीचे सभापती वसंतराव पवार, उपसभापती रतन बोरणारे, संचालक किसन धनगे, संजय बनकर, अल्केश कासलीवाल, समता परिषदेचे शहराध्यक्ष भूषण लाघवे, खरेदी-विक्री संघाचे संचालक सुमीत थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल शिंदे, नगरसेवक गटनेते गणेश शिंदे, शहराध्यक्ष दत्ता निकम, मकरंद सोनवणे, प्रवीण बनकर, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे आदींसह सर्व क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.
----------