Latest Marathi News | भुजबळांनी MVP संस्थेस दिली 5 लाखांची देणगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal giving fund to MVP

Nashik : भुजबळांनी MVP संस्थेस दिली 5 लाखांची देणगी

नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेस पाच लाखांची देणगी दिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची राष्ट्रवादी भवनाच्या परिसरात ‘मविप्र'चे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे आणि सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार दिलीप बनकर आदी उपस्थित होते. (Chhagan Bhujbal donated 5 lakhs to MVP organization Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik : वनविभागाकडून दुर्मिळ प्रजातीचे कासव जप्त; एकास अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘मविप्र' पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या भेटीवेळी मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. श्री. पवार यांनी एक कोटींची देणगी दिली होती. श्री. भुजबळ यांनी मदतीचा धनादेश ॲड ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. श्री. क्षीरसागर, डॉ. अशोक पिंगळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: अबब! कोथिंबिरीला मिळाला हजारांत भाव; शेतकरी मालामाल

Web Title: Chhagan Bhujbal Donated 5 Lakhs To Mvp Organization Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..