नाशिक: ‘‘ मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील दहा टक्के, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाचे (एसईबीसी) दहा टक्के आणि खुल्या प्रवर्गातील ५० टक्के आरक्षण नको आहे का?’’ असा प्रश्न राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आज उपस्थित केला आहे. नाशिकमध्ये शुक्रवारी (ता.१२) त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.