येवला- आता शिळ्या कढीला ऊत आणण्याचं काही कारण आहे का? तुमची इच्छा असेल आणि येवलेकर जर म्हणाले, तर जाईल, जरा विचारून पाहतो सर्वांना... असे मिश्किल उत्तर मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यसभा खासदारकीच्या मुद्यावर दिले. श्री. भुजबळ इच्छुक होते. मात्र, संधी मिळाली नव्हती, या पार्श्वभूमीवर पत्रकारांच्या प्रश्नावर ते बोलत होते.