esakal | विरोधकांच्या नातेवाईकांवर छापे टाकणे हा अतिरेक : छगन भुजबळ | Nashik
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal

विरोधकांच्या नातेवाईकांवर छापे टाकणे हा अतिरेक : छगन भुजबळ

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : केंद्रा शासनाच्या विरोधात जास्त बोललं तर तोंड बंद करण्यासाठी केंद्राच्या वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर सुरु आहे. पण आता त्यापुढे जाउन विरोधकांच्या नातेवाईकांच्या घरी छापे टाकण्याचे प्रकार म्हणजे अतिरेक आहे. असा आरोप पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला.कोरोना आढावा बैठकीनंतर उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या वरील कारवायांबाबत भुजबळ पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, केंद्र शासनाच्या विविध यंत्रणाकडून जे सुरु आहे. ते अतिशय विचित्र सुरु आहे. राजकिय विरोधकांना त्रास देण्यासाठी त्यांच्यावर कारवाया करतांना त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापे टाकण्याचे प्रकार म्हणजे लोकशाहीत असे प्रकार क्वचित घडले असतील, मात्र आता सर्रास सुरु झाले आहे. नातेवाईकांच्या घरी जाऊन कारवाई करणं हा अतिरेक आहे.आमचे तीन पक्षाचे सरकार झगडे होणारच

जिल्ह्यात काही दिवसांपासून शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी कॉग्रेस यांच्यात राजकिय आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी भुजबळ यांच्या वर आरोप केले असतांना दोन दिवसांपूर्वी माजी आमदार योगेश घोलप यांनी देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांच्यावर श्रेय चोरीचे आरोप केला महाविकास आघाडीतील या धुसफूसबाबत श्री भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही सर्व एकत्र काम करतोय. एका पक्षाच्या सरकारमध्येही मतभेद व झगडे होतात, आमचे तर तीन पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे आरोप- प्रत्यारोपांकडे फार लक्ष देउ नका.

हेही वाचा: नाशिक शहरात दररोज होणार सहा हजार चाचण्याटोल बंद केले म्हणून खड्डे

भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहातूक मंत्री नितीन गडकरी यांचे राष्ट्रीय महामार्गावरील खड्यांकडे लक्ष वेधले होते. राष्ट्रीय महामार्गासोबत राज्य महामार्गाच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्याविषयी श्री भुजबळ यांना विचारले असता, राज्य मार्गावरील टोल बंद केले तर राष्ट्रीय महामार्गावरील टोल मात्र सुरुच आहे. सर्व राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्गाला देऊन टाकावे असा उपाय सुचविला. लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडा बाबत भुजबळ यांनी निषेध केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जालियनवाला हत्याकांड बरोबर लखीमपूरची केलेली तुलना योग्यच आहे. या घटनेच्या विरोधात सर्वांनी मिळून ११ तारखेला कडकडीत बंद पाळीत बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा: नाशिक : साडेसात महिन्यांनंतर रम्मी-जिम्मीच्या आवळल्या मुसक्या

loading image
go to top