Chhagan Bhujbal On Hotel Opening
Chhagan Bhujbal On Hotel OpeningGoogle

'हॉटेलांवरील निर्बंध तूर्तास कायम' - पालकमंत्री भुजबळ

Published on

नाशिक : राज्य शासनाने कोरोनाचे निर्बंध शिथिल करताना हॉटेल्स, रेस्टॉरंट दुपारी चारपर्यंतच सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात हॉटेल व्यावसायिकांच्या भावना कळविल्या असून मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

हॉटेलच्या वेळा वाढवून देण्यासाठी नाशिकमध्येही रेस्टॉरंट चालकांनी आंदोलन केले. मात्र हॉटेल रात्री अकरापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिल्यास संचारबंदी नियमांचा भंग होईल. हॉटेलच्या नावाखाली नागरिक गर्दी करतील, त्यामुळे तूर्तास तरी हॉटेल्स, रेस्टॉरण्टला वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय होणे अशक्य असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

शासनाने मॉल्स आणि दुकानांना रात्री आठपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र हॉटेल व्यवसायाला या निर्बंधातून कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे या घटकांना रात्री अकरापर्यंत वेळ वाढवून देण्यात यावी अशी मागणी नाशिक जिल्हा हॉटेल्स अ‍ॅन्ड बार असोसिएशनने केली आहे. रेस्टॉरंट चालकांनी दोनच दिवसांपूर्वी शहरात आंदोलन केले. लवकरच सर्व व्यावसायिक पालकमंत्र्यांची भेट घेणार आहेत. याबाबत भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले, इतर दुकानांना रात्री आठपर्यंत मुभा दिली असताना हॉटेल्सना रात्री अकरापर्यंत वेळ वाढवून देणे तूर्तास शक्य नाही.

Chhagan Bhujbal On Hotel Opening
"आदित्य ठाकरे भविष्यात राज्याचे नेतृत्व करतील!"

हॉटेल्समध्ये जाण्याच्या बहाण्याने नागरिक रस्त्यावर गर्दी करतील, त्यामुळे संचारबंदी नियमाचा भंग होईल. हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ खाण्यासाठी तर मास्क काढावे लागतील, त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटकांचाही शासन सहानुभूतिपूर्वक विचार करत आहे. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. मंदिरांबाबतही स्थानिक स्तरावर कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही.

- छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक.

Chhagan Bhujbal On Hotel Opening
नाशिक मेट्रोच्या कोच डिझाइनसाठी ‘BHEL’चा पुढाकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com