esakal | "आदित्य ठाकरे भविष्यात राज्याचे नेतृत्व करतील!"
sakal

बोलून बातमी शोधा

आदित्य ठाकरे

"आदित्य ठाकरे भविष्यात राज्याचे नेतृत्व करतील!"

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ


सिडको (नाशिक) :
युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेनेची राज्यभर चांगली बांधणी केली आहे. ते मुंबई महापालिकेचेच नव्हे तर राज्याचे नेतृत्व करतील.असे प्रतिपादन युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केले.


नाशिकच्या खुटवडनगर येथे शनिवारी युवा संवाद दौऱ्यात ते बोलत होते. कोरोनाचे महाभयंकर संकट, महापूर, राजकीय संघर्ष, केंद्रीय एजन्सींचा सरकारवरील दबाव या सर्व संकटांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयमाने आणि धैर्याने सामोरे गेले. महाराष्ट्र आणि जनहिताचे निर्णय त्यांनी घेतले. वेळोवेळी संवाद साधून जनतेची मने जिंकली. त्यांच्या लोकाभिमुख कामांमुळे, निर्णयांमुळे ते महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर लोकप्रिय झाले आहे. महाराष्ट्रात यापुढेही अनेक वर्षे कायम शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाहिजे ही जनतेची भावना झाली आहे. संवाद दौऱ्यानिमित्त राज्यभर शिवसेना, युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसह विरोधी पक्षातील नेते आणि प्रतिष्ठितांच्या भेटीतून याचा प्रत्यय आला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुका या ताकदीने लढविल्या जातील. मुंबई विद्यापीठाप्रमाणेच सर्वच्या सर्व जागांवर यश मिळवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात शिवसेनेचाच भगवा कायम फडकत राहावा ही जनभावना मतदानात उतरविण्यासाठी शिवसेनेच्या मार्गदर्शनाखाली काम करा. युवासेना गावागावात, घराघरात पोचविण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधा. सरकारचे निर्णय, योजना जनतेपर्यंत पोचवा. मजबूत संघटन उभे करा, असे आवाहन त्यांनी केले

हेही वाचा: नाशिक : लेह-लडाखमध्ये घुमला दि. बा. पाटलांच्या नावाचा जयघोष

loading image
go to top