तिसऱ्या लाटेत बालरोगतज्ञांची भूमिका महत्त्वाची - छगन भुजबळ

chhagan bhujbal
chhagan bhujbalesakal
Summary

लहान मुलांना संभाव्य धोका लक्षात घेऊन करावयाच्या उपाययोजनांबाबत बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भुजबळ यांची भेट घेतली. संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन भुजबळ यांना देण्यात आले.

नाशिक : कोरोनाच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होऊ शकतो, असे तज्ञांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत बालरोग तज्ञांची (pediatricians) भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून डॉक्टरांना सहकार्य करण्यात येईल, असे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शुक्रवारी (ता. २८) येथे सांगितले. (Chhagan Bhujbal said that the role of pediatricians is important in the third wave of corona)


लहान मुलांना संभाव्य धोका लक्षात घेऊन करावयाच्या उपाययोजनांबाबत बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भुजबळ यांची भेट घेतली. संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन भुजबळ यांना देण्यात आले. लहान मुलांमध्ये डेक्सामेथासोन, इमुनोग्लोबुलीन, पॅरॅसिटॅमोल यांसह लागणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असावीत, लहान मुलांना एको कार्डीयोग्राफी तपासणी करणारे तज्ज्ञ उपलब्ध असावेत यांसह विविध मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत.
बालरोग तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांचा अभ्यास करून तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. बालरोग तज्ज्ञांनी प्रशासनाला सहकार्य करून या तिसऱ्या लाटेत आपली महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी. डॉक्टरांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असे भुजबळ यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, डॉ. राजेंद्र कुलकर्णी, डॉ. रवींद्र सोनवणे, डॉ. मिलिंद भराडिया, डॉ. प्रशांत कुटे, डॉ. रिना राठी, डॉ. शर्मिला कुलकर्णी, डॉ. वैभव पुस्तके, डॉ. केदार मालवतकर, डॉ. सुशील पारख, डॉ. अमोल मुरकुटे, डॉ. गौरव नेरकर, डॉ. योगेश गोसावी, डॉ. संदीप वासनकर, डॉ. श्‍याम हिरे, आकाश पगार, संदीप अहिरे आदी उपस्थित होते.

chhagan bhujbal
नाशिक शहरात ११८४ धोकादायक घरे, वाडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com