Chhagan Bhujbal on Nashik road potholes
esakal
नाशिक : शहरात रस्त्यांवर पडलेले खड्डे, खड्ड्यांमुळे होणारे अपघात व मृत्यू या सर्व प्रकारच्या हलगर्जीला महापालिका आयुक्त व प्रशासनाचा ढिसाळ कारभार जबाबदार असून, लोकांच्या मनस्तापाची दखल घेतली नाही किंवा अपघातग्रस्तांचे कुटुंब थेट महापालिका मुख्यालयात येत असेल, त्यांना प्रतिसाद मिळाला पाहिजे. लोकांच्या असंतोषाची परीक्षा पाहू नका, इतिहास आपल्या समोर (Nashik Municipal Corporation road pothole controversy) आहे, असा थेट हल्लाबोल अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केला.