Chhagan Bhujbal News : मुंबईचे पद घेतले म्हणजे नाशिक सोडले नाही; भुजबळांचे स्पष्टीकरण

Speaking at the officers' review meeting, Minister Chhagan Bhujbal and others.
Speaking at the officers' review meeting, Minister Chhagan Bhujbal and others.esakal

Chhagan Bhujbal News : राष्ट्रवादी काँग्रेसने मला मुंबईचा पक्षनेता केले आहे. आम्ही नाही म्हणत असतानाही पक्ष संघटन वाढीसाठी पक्ष नेत्यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांना मुंबईचे अध्यक्षपद दिले आहे. याचा अर्थ आम्ही नाशिक सोडून चाललो अशातला काही भाग नाही.

मुंबईसह नाशिकची जबाबदारी आम्ही पार पाडणार आहोत, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. दरम्यान, येथे १३ ऑक्टोबरला होणारा मुक्तिभूमीचा वर्धापन दिन तसेच नवरात्रोत्सवातील श्रीक्षेत्र कोटमगाव, निमगाव वाकडा व लोणजाई माता यात्रोत्सवाच्या बैठकीत त्यांनी आढावा घेतला.

श्री. भुजबळ यांनी येथील संपर्क कार्यालयात अधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेऊन सूचना केल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुंबई अध्यक्ष निवडीबाबत भूमिका मांडली. (chhagan bhujbal statement about mumbai nashik news)

आढावा बैठकीत मंत्री भुजबळ म्हणाले, की १३ ऑक्टोबरला मुक्तिभूमीवर भव्य कार्यक्रम होतो, यासाठी राज्यभरातून अनुयायी येणार आहेत. त्यामुळे अनुयायांच्या गर्दीचे योग्य नियोजन करण्यात यावे. ‘बार्टी’च्या अधिकाऱ्यांनी पोलिस यंत्रणांशी समन्वय साधून मुक्तिभूमी बाहेरील बॅरेकेटिंग व मुक्तिभूमीच्या आतील सर्व व्यवस्था चोख ठेवावी.

स्टॉल शिस्तबद्ध लावावेत, पोलिस यंत्रणेने लाउडस्पीकरची परवानगी देताना नियोजन करून आवाजाचा गोंधळ होऊ देऊ नये, परिसराची साफसफाई, पिण्याचे स्वच्छ पाणी, फिरते स्वच्छतागृह, पोलिस बंदोबस्त, गर्दीचे नियोजन करण्याच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या.

श्रीक्षेत्र कोटमगाव यात्रोत्सवाच्या अनुषंगाने औरंगाबाद रोडपासून मंदिरापर्यंत अतिक्रमण संयुक्तरित्या काढावे तसेच आवश्यक तेथे बॅरेकेटिंग करावे. यात्रेच्या ठिकाणी पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्धतेसाठी संयुक्तरीत्या कार्यवाही करावी.

Speaking at the officers' review meeting, Minister Chhagan Bhujbal and others.
Chhagan Bhujbal : अजित पवारांशी मी मोठ्या आवाजात बोललो : छगन भुजबळ

औरंगाबाद महामार्गावर होणारी पार्किंग व वाहतुकीचे नियोजन करावे. दुकान व स्टॉलसाठी परवानगी देताना ग्रामपंचायतीने नियोजन करावे. आरोग्य पथक तैनात ठेवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

राजापूर व ४० गाव पाणीपुरवठा योजनेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाइपलाइनसाठी आवश्यक परवानगी देण्यात यावी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने प्रलंबित असलेला प्रस्ताव ऑनलाइन सादर करण्याच्या सूचनाही भुजबळांनी दिल्या. उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश पालवे, तहसीलदार आबा महाजन, तहसीलदार शरद घोरपडे, उपविभागीय अभियंता अभिजित शेलार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, अंगणगाव येथील मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयात जिल्हा क्रीडा निधी अंतर्गत ग्रीन जिमचे उद्‍घाटन भुजबळ यांच्या हस्ते झाले. संस्थाध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे व शिक्षक उपस्थित होते. रायते येथे स्थानिक विकास निधीतून साकारलेल्या सभामंडपाचे लोकार्पण भुजबळ यांच्या हस्ते झाले. सरपंच भूषण गोठी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.Chhagan Bhujbal

Speaking at the officers' review meeting, Minister Chhagan Bhujbal and others.
Chhagan Bhujbal : ''मी आमदार झाल्यानंतर चार महिन्यांनी तुमचा जन्म झालाय'' छगन भुजबळ रोहित पवारांवर संतापले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com