Chhagan Bhujbal : निवडणुका कधीही झाल्या तरीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रहा तयार : छगन भुजबळ | Chhagan Bhujbal statement about NCP workers be ready elections nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : निवडणुका कधीही झाल्या तरीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रहा तयार : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभा निवडणुका कधीही झाल्या, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

पक्षाच्या प्रत्येक सेलच्या संघटनात्मक वाढीसाठी योगदान द्यावे, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज येथे सांगितले. (Chhagan Bhujbal statement about NCP workers be ready elections nashik news )

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन सोहळ्याच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी भवनात शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यावेळी श्री. भुजबळ यांनी नगर येथे होत असलेल्या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे सांगितले.

तसेच देशात महापुरुषांची बदनामी करण्यात येत असून त्याविरोधात आपण जागृक राहून लढा दिला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे जिल्ह्यावर विशेष प्रेम असून सध्या जिल्ह्यात पक्षाचे सहा आमदार आहेत, असे सांगत श्री. भुजबळ यांनी आगामी निवडणुकीत पक्षाचे दहा आमदार निवडून आले पाहिजे, असे कार्यकर्त्यांना उद्दिष्ट दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार सरोज आहिरे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी आमदार संजय चव्हाण, माजी आमदार शिवराम झोले, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे,

प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे आदी उपस्थित होते.