नाशिक- मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावा : भुजबळ

chhagan Bhujbal talking in meeting
chhagan Bhujbal talking in meetingesakal
Updated on

नाशिक : नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची (National Highway) पावसाळ्यात (Monsoon) दुर्दशा होते. या मार्गावरील रस्ते निकृष्ट असल्याने जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे रस्त्यांची प्रलंबित कामे यंत्रणांनी तत्काळ मार्गी लावावीत, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिले. मंत्रालयात गोंदे ते वडपे आणि वडपे ते ठाणे परिसरातील रस्त्यांच्या कामासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. (chhagan Bhujbal statement on Nashik Mumbai highway pending works Nashik News)

बैठकीला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नाशिकचे सरव्यवस्थापक बी. एस. साळुंखे, वाहतूक व्यवस्थापक डी. आर. पटेल, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता आर. ए. डोंगरे, मुंबई-नाशिक एक्सप्रेस वे लिमिटेडचे सरव्यवस्थापक ए. एस. सुमेश, श्रीमती वसुंधरा आदी उपस्थित होते.

chhagan Bhujbal talking in meeting
सेनेची सुरक्षित मते पवारांना उर्वरित राऊतांना : आमदार नीतेश राणे

श्री. भुजबळ म्हणाले, की सर्व रस्ते वाहतूक तसेच कार्यान्वयीन यंत्रणांनी आपल्या कामात समन्वय ठेवावा. वडपे ते ठाणे या परिसरात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. स्थानिक यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामांची स्वत: पाहणी करावी व कामांना गती द्यावी. वारंवार खराब होणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात यावे. जेणेकरून वाहतूक विनाअडथळा सुरळीत सुरू राहील. आगामी दहा वर्षात होणारे रस्ते आणि परिसरातून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे नियोजन सर्व रस्ते विकास यंत्रणांनी आतापासून करावे. शिवाय खड्ड्यांमुळे महामार्गावर पावसाळ्यात मोठा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी आणि समस्यांसाठी संबंधित यंत्रणांनी तयारी ठेवावी. रस्त्यावर खड्डे पडणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

chhagan Bhujbal talking in meeting
Nashik : कोरोनाने पालक गमावलेल्या बालकांच्या निधीसाठी अर्ज करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Three-Hour Rescue Drama Ends in Tragedy in Awahana-Khedi River Incident
NEET paper leak case CBI photo helped Nashik Police detain suspect quickly
NEET Paper Leak Controversy
Monsoon rain Weather imd Alert
Marathi News Esakal
www.esakal.com