सेनेची सुरक्षित मते पवारांना उर्वरित राऊतांना : आमदार नीतेश राणे

 Nitesh Rane News
Nitesh Rane Newsesakal

नाशिक : राज्यसभेसाठी शिवसेनेने उमेदवारी दिलेले संजय पवार कट्टर शिवसैनिक असून सेनेचे आमदार सुरक्षित मते पवार यांना देतील तर उर्वरित मते सेनेत बाहेरून आलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांना देतील असा दावा करत आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेनेला डिवचले.

नाशिकमध्ये भाजपच्या आंदोलनासाठी आलेल्या आमदार राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले,त्रिपुरा राज्यात काही झाले नाही तरीही मालेगाव, अमरावतीमध्ये दंगल होते. यावरून राज्य अशी परिस्थिती किती गंभीर आहे हे दिसून येते. राज्यात तर थेट देविदेवतांचा अपमान होतो. शरद पवार यांच्यावर कविता पोस्ट करणारा अजूनही अटकेत आहे, पोलिस अशी सतर्कता दाखवत असतील तर इतर बाबतीत का पुढे नाही... आवेश सिद्दीकी नावाच्या मुलाने शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकली. अद्यापही त्यावर कारवाई होत नाही. लवकर कारवाई करा अन्यथा पावसाळी अधिवेशनात जाब विचारला जाईल.

 Nitesh Rane News
रेल्वेच्या अनारक्षित तिकिटांच्या महसुलात 518 टक्क्यांची वाढ

काश्मिरी पंडितांबाबत सध्या टीका सुरू आहे. मात्र पंतप्रधान मोदी परिस्थितीला तोंड देण्यासाठी समर्थ आहे, हे विरोधकांनी विसरू नये, असे सांगताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला आता मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत ते नामांतर का करत नाही, असा सवाल करीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली. आदित्य यांनी ज्ञानव्यापी मस्जिद संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन राणे यांनी केले.

 Nitesh Rane News
जळगाव : मागील भांडण उकरून एकाला बेदम मारहाण

राऊत यांना शिल्लक मते

राज्यसभेसाठी शिवसेनेकडून कट्टर शिवसैनिक संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आमदार राऊत यांना मते देतील का याबाबत शंका आहे. सुरक्षित मते पवार यांना देऊन उरलेली मते संजय राऊत यांना मिळतील, असा दावा राणे यांनी यावेळी केला. राज्यसभेच्या मतदानासाठी शिवसेनेला आमदारांना कोंडून ठेवावे लागते यावरून शिवसेनेची स्थिती किती वाईट आहे हे लक्षात येते. नारायण राणे यांच्या काळात शिवसेना आमदारांना संरक्षण देत होती. आता परिस्थिती उलट असल्याची टीका राणे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com