Nashik Chhagan Bhujbal : मी कार्यकर्ता म्हणून नव्हे तर नेता म्हणून राष्ट्रवादीत आलो; रोहित पवारांवर पलटवार

chhagan bhujbal
chhagan bhujbalesakal

Nashik Chhagan Bhujbal : मला मोठे केले, असे सांगणाऱ्या रोहित पवार यांनी इतिहास जाणून घ्यावा. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामान्य कार्यकर्ता म्हणून आलो नव्हतो, तर शिवसेनेचा नेता म्हणून आलो होतो, अशा शब्दात कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी (ता. १०) रोहित पवारांच्या वक्तव्याला उत्तर दिले.

रोहित पवारांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन उत्तर देईल, असेही ते म्हणाले. (chhagan bhujbal statement on rohit pawar statement nashik news)

रोहित पवार हे शरद पवारांच्या सभेसाठी नाशिकमध्ये आले असताना त्यांनी श्री. भुजबळ यांच्यावर टीका केली होती. तसेच येवल्याच्या सभेत बालेकिल्ला कुणाचा हे जनताच ठरवेल, असे म्हटले होते. त्यावर उत्तर देताना श्री. भुजबळ रोहित पवारांवर चिडले होते. ते म्हणाले, की रोहित पवारला सांगा. मी जानेवारी-फेब्रुवारी १९८५ मध्ये आमदार झालो.

एप्रिल १९८५ ला मुंबईचा महापौर झालो. त्यानंतर चार महिन्यांनी तुमचा जन्म झाला. त्यामुळे मला मोठे केले, मोठे केले असल्या गोष्टी करू नका. मी सामान्य कार्यकर्ता म्हणून शरद पवार यांच्यासोबत आलो नव्हतो. मी शिवसेनेचा नेता होतो. ते जेवढे पुढे येतील तेवढे लवकर त्यांच्या मतदारसंघात जाऊन उत्तर देईन.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

chhagan bhujbal
NCP Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीने कामाला लागावे; शरद पवार यांच्या सूचना

विठ्ठलाचा दाखला पण...

शरद पवार आमचे विठ्ठल आहेत, त्यांना बडव्यांनी घेरले, असे वक्तव्य श्री. भुजबळ यांनी केले होते. याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना भुजबळ म्हणाले, की राज ठाकरे, नारायण राणे असे अनेक नेते त्यासंबंधाने बोलले आहेत.

हा खोचक शब्द नाही. वाक्यप्रचाराचा उपयोग करताना अपमान करण्याचा हेतू नाही. विठ्ठलाभोवती दोन ते चार जण थांबलेले असतात आणि चला, चला म्हणतात. राजकारणात कानाला काही मंडळी लागलेली असते आणि राजकारण घडते. इतरांचे म्हणणे त्यातून कानावर जात नाही.

अजित पवार येवल्यात येणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची येवल्यात लवकर सभा घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले. शासन आपल्या दारी, विधिमंडळ अधिवेशन आणि शरद पवार यांच्यासोबत दिसलेले आमदार परत येऊन प्रतिज्ञापत्र देतात, अशा कामात सध्या उपमुख्यमंत्री आहेत. पुण्यातील फुले वाड्यात मस्तक ठेवून आशीर्वाद घेतल्यावर कार्यकर्त्यांना भेटून मुंबईला जाणार आहे, असेही ते म्हणाले.

chhagan bhujbal
Death threat to Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी! राजकीय वर्तुळात खळबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com