NCP Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीने कामाला लागावे; शरद पवार यांच्या सूचना

Sharad pawar vs Ajit pawar
Sharad pawar vs Ajit pawarEsakal

NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नाशिकहून ठराविक पदाधिकाऱ्यांना बोलावून लोकांच्या मनातलं जाणून घेण्याबरोबरच पक्षात काम करण्याची संधी मिळालेल्या दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना कामाला लागा, शहरावर लक्ष ठेवा, असे आवाहन करीत संघटन मजबूत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

माझे नाशिककडे विशेष लक्ष आहे, पदाधिकाऱ्यांनी विशेष करून शहरावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. (Sharad Pawar suggestion that second line of ncp should start working nashik news)

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवारअजित पवार असे दोन गट तयार झाले आहेत. शरद पवार यांनी मीच पक्षाचा आश्वासक चेहरा असल्याचे जाहीर केले. ते आता जनतेच्या दरबारात जात असून, त्याची सुरवात त्यांनी नाशिकपासून केली.

शनिवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार पवार यांच्या बैठका तसेच येवला येथील सभेला मोठी गर्दी झाली. सभागृह खचाखच भरण्याबरोबरच बाहेरदेखील गर्दी ओसंडून वाहत होती. त्यामुळे पवार यांच्या भूमिकेला लोकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट झाले.

नाशिकमधील कार्यक्रम आटोपून पवार येवला येथे रवाना झाले. द्वारका येथे नागरिकांनी वाहने थांबून पवार यांची स्वागत केले. त्यानंतर पुढे जागोजागी त्यांचे स्वागत करण्यात आले. नांदूर नाका, चांदोरी, सायखेडा, निफाड, लासलगाव, विंचूर येथेही त्यांचे जोरदार स्वागत झाले. येवला येथे त्यांची जोरदार सभा झाल्यानंतर नाशिकला येऊन रविवारी ते मुंबईत पोचले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sharad pawar vs Ajit pawar
Chhagan Bhujbal on Sharad Pawar: पक्षफुटीला मला का जबाबदार धरताहेत? छगन भुजबळ यांचा पवारांना प्रश्न

नाशिकमध्ये पुढील रणनीती आखण्यासाठी त्यांनी काही निवडक कार्यकर्त्यांना बोलवून घेतले होते. यामध्ये माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे, लक्ष्मण मंडाले, दत्तात्रय माळोदे यांचा समावेश होता.

श्री. पिंगळे यांच्याशी चर्चा करताना नाशिक शहर व जिल्ह्याचा आढावा त्यांनी घेतला. मतदारांचा कल जाणून घेताना नाशिक शहरामध्ये विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. गजानन शेलार यांनी केलेल्या नियोजनाचे त्यांनी कौतुक केले.

शेलार यांच्यासोबतच विशिष्ट पदाधिकाऱ्यांना संघटना बांधणीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. युवावर्गाच्या मिळालेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले, अशी माहिती श्री. पिंगळे यांनी दिली.

जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, ॲड. माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, आमदार नरेंद्र दराडे यांच्यासह अनेकांनी दोन-तीन दिवसांत केलेल्या नियोजनाचे खासदार पवार यांनी कौतुक केले. गोकुळ पिंगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार व आमदार राहिलेले तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती देवीदास पिंगळे यांचे बंधू आहेत. देवीदास पिंगळे अजित पवार गटात सहभागी आहेत.

Sharad pawar vs Ajit pawar
Sharad Pawar: ‘साहेब, शेवटच्या श्‍वासापर्यंत आमच्या काळजात तुम्हीच’! नाशिकच्या कार्यकर्त्यांचे भावनिक पत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com