esakal | छगन भुजबळ म्हणाले, सचिन पाटिल यांची बदली थांबवणारा मी कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan-bhujbal

छगन भुजबळ म्हणाले, सचिन पाटिल यांची बदली थांबवणारा मी कोण?

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : पोलिस अधीक्षक सचिन पाटील (Sachin Patil) यांची बदली रद्द करण्यासाठी मला निवेदन आले आहे, पण मी त्या खात्याचा मंत्री नाही. पोलिस अधीक्षक बदल्यांचा विषय गृहमंत्र्यांच्या खात्याचा विषय आहे. त्या खात्यांचे सक्षम मंत्री आहे, याशिवाय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत. मी बदली थांबविणारा कोण? असे स्पष्ट करीत, पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी हा विषय टोलावून लावला.पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या बदली रोखण्यासाठी शहरातील काही सामाजिक संघटना सक्रिय झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांकडे अडकून पडलेले पैसे काढून देण्यासाठी पाटील सक्रिय होते. त्यामुळे त्यांची बदली थांबवावी अशी मागणी आहे. त्यानुषंगाने भुजबळ यांनी हा विषय गृहमंत्र्यांकडील असल्याचे सांगत हात झटकले.

हेही वाचा: भुजबळ-कांदे यांच्यात पॅचअप; कलेक्टरांच्या मध्यस्थीने मिटला वाद

कोरोना आढावा बैठकीनंतर भुजबळ बोलत होते. ओबीसी आरक्षणावरुन निवडणूका पुढे ढकलता येणार नाही. असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश झाला असून त्याविषयी विचारले असता, भुजबळ म्हणाले की, राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूका पुढे ढकलल्या आहेत. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने निवडणूका पुढे ढकलण्याचा विषय नाही. कोरोना निर्बंधामुळे निवडणूका पुढे ढकलल्या असतांना याच लांबलेल्या काळात ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लावण्याचे काम संपवून टाकू असे शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने याविषयी मुख्यमंत्र्यासह राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष सर्वसहमतीने पुढील निर्णय घेतील.

हेही वाचा: अवघ्या २० रुपयांसाठी मजुराची गळा चिरून हत्या; नाशिकमधील प्रकार

loading image
go to top