Chhagan Bhujbal : वाटलं विरोधी पक्षनेतेपद अन् झाले मंत्री! राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उलगडला मुंबई प्रवासाचा पट

chhagan Bhujbal took oath as cabinet minister nashik news
chhagan Bhujbal took oath as cabinet minister nashik newsesakal

Chhagan Bhujbal : ‘आज सकाळी अकरापर्यंत मुंबईला या’ असा निरोप मोबाईलवरून शनिवारी (ता. १) रात्री उशिरा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातून मिळाला. वाटलं की, अजित पवार विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन प्रदेशाध्यक्ष होतील.

विरोधी पक्षनेतेपदासाठी कदाचित पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे जायचं असेल. पण दुपारच्या सुमारास बांद्र्यातून राजभवनात बोलवलं. पाहतो तो काय? श्री. भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. (chhagan Bhujbal took oath as cabinet minister nashik news)

हे उद्घार आहेत, श्री. भुजबळ यांनी बोलावलं म्हणून मुंबईला गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याचे. मुंबईच्या प्रवासाचा सारा पट उलगडून दाखवित त्यांनी सारेच आश्चर्यकारक असल्याचे सांगितले. आजच्या राजकीय घडामोडींविषयी पक्षाच्या स्थानिक नेत्यांची प्रतिक्रिया काय आहे, हे जाणून घेण्यासाठी संपर्क केल्यावर हे ऐकायला मिळाले.

नाशिकहून बांद्र्याला गेलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना श्री. भुजबळ भेटले. ‘मी अजितदादांकडे जाऊन येतो’, असे सांगून श्री. भुजबळ रवाना झाले. आम्हाला वाटलं, की विरोधी पक्षनेतेपदासाठी दादांशी बोलायचे असेल. श्री. भुजबळ यांच्या भेटीनंतर बराच वेळ झाल्यावर थेट राजभवनात बोलावण्यात आले. राजभवनात गेल्यावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय दिलीप वळसे-पाटील, खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल दिसले.

त्यामुळे पुन्हा वाटलं पक्षाध्यक्षांच्या सूचनेनुसार हे सारं घडलं असावं. शपथविधीनंतर मुंबईहून नाशिककडे परत असताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद काळजीपूर्वक ऐकली. त्यानंतर मात्र काही कळेना असे झाले, अशी सारी माहिती राष्ट्रवादीच्या प्रवासाचा पट उलगडणाऱ्या नेत्यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

chhagan Bhujbal took oath as cabinet minister nashik news
Ajit Pawar Analysis : दुपारचा शपथविधी! 

चित्र अजून ‘क्लिअर’ व्हायचंय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेस एक आहे. तरीही चित्र अजून ‘क्लिअर’ झालेले दिसत नाही. पक्षाचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लग्नासाठी बाहेर आलो आहे, एवढेच सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्याकडून ‘मी बैठकीत आहे’ असा एसएमएस दोनदा मिळाला. एकूण सारी परिस्थिती पाहिल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्या संभ्रमावस्था असल्याचे चित्र दिसत आहे.

राष्ट्रवादीच्या गोटात शांतता

स्थानिकपासून ते राज्य, राष्ट्रीय स्तरावरील घडामोडींची सकारात्मक-विरोधाची प्रतिक्रिया उमटवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात शांतता राहिली. त्यामागे कारण तसे होते. उपमुख्यमंत्री अजित पवार की पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापैकी कोणाचे समर्थन करायचे? असा भलामोठा प्रश्‍न पदाधिकाऱ्यांपुढे तयार झाला आहे. श्री. भुजबळ यांचे समर्थक मुंबईला गेले आहेत. त्यामुळे श्री. भुजबळ यांचे समर्थक नाशिकला परतल्यावर अधिक चित्र स्पष्ट होईल.

chhagan Bhujbal took oath as cabinet minister nashik news
Ajit Pawar: राष्ट्रवादीच्या बंडामुळे काँग्रेसला काळजी विरोधी पक्षांच्या ऐक्याची; राजकीय फायद्यासाठी विचारमंथन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com