esakal | छगन भुजबळांच्या वाढदिवसा निमित्त अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करणार
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

छगन भुजबळांच्या वाढदिवसा निमित्त अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ यांचा १५ ऑक्टोबरला अमृतमहोत्सवी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यात अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याचा निर्णय बुधवारी (ता.६) राष्ट्रवादी भवनात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, नाशिक लोकसभा अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी आमदार जयवंत जाधव, बाळासाहेब कर्डक, सहकार सेल प्रदेशाध्यक्ष भारद्वाज पगारे, महापालिका गटनेते गजानन शेलार, जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा अनिता भामरे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, शहराध्यक्ष अंबादास खैरे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष यशवंत शिरसाट, शहराध्यक्ष धनंजय निकाळे, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, शहराध्यक्ष डॉ. अमोल वाजे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजूरकर, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अकबर शहा, शहर कार्याध्यक्ष इम्रान पठाण यांच्यासह तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

तालुका आणि प्रभागनिहाय अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम होतील. रक्तदान शिबिरे, शाखा उद्‍घाटन, रोगनिदान शिबिर, महिलांसाठी कर्करोग व अन्य रोगनिदान शिबिरे, मुक्या पाळीव जनावरांची रोगनिदान शिबिरे, ज्येष्ठ नागरिकांचे मेळावे, नोकरीविषयक मार्गदर्शन शिबिरे, शैक्षणिक साहित्यवाटप, अनाथ मुलांना दत्तक घेणे, संघर्षयोद्धा व्याख्यानमाला, चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान, रेशनकार्ड शिबिरे, नेत्र व मधुमेह तपासणी शिबिरे, मिठाई-फळवाटप आदी कार्यक्रमांचा त्यात समावेश असेल.

loading image
go to top