उगवत्या सूर्यनारायणाला जल अर्पण करून छटपुजेची सांगता

उगवत्या सूर्यनारायणाला जल अर्पण करून छटपुजेची सांगता
Published on: 
शहर टुडे पान चारसाठी -------- NSK26H35168 जळगाव : मेहरुण तलावाच्या काठावर सोमवारी छटपूजाप्रसंगी उगवत्या सूर्यनारायणाला जलार्पण करताना भाविक. ......... सूर्यनारायणाला जलार्पण करून छटपुजेची सांगता ----- सुख-शांतीसाठी होम-हवन; मेहरुण तलावावरील गणेश घाटाची स्वच्छता सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : येथील उत्तर भारतीय संघ छट पुजा समितीतर्फे मेहरुण तलावाच्या गणेश घाटावर छटपूजा कार्यक्रम दोन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवारी (ता.१६) पहाटे उगवत्या सूर्यनारायणाला हजारो उत्तर भारतीयांनी जलार्पण करून छटपुजेची सांगता करण्यात आली. यावेळी होम-हवन करून सुख शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. उत्तर भारतीय संघ छठपूजा समितीतर्फे मेहरुण तलाव येथील गणेश घाटावर रविवारी(ता.१५) सायंकाळी पाचपासून ते सोमवारी (ता.१६) सकाळी आठपर्यंत छठपुजा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी रात्रभर पुजा, महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रम गणेश घाटावर घेण्यात आले. शुक्रवारी पहाटे उगवत्या सूर्यनारायणाला हजारो भाविकांनी जलार्पण करून पुजा केली. गायत्री मंत्रोच्चारात होम-हवन करण्यात येऊन हजारो भाविकांनी सुख-शांती, पूत्रप्राप्ती व चांगले आरोग्य लाभो, यासाठी प्रार्थना केली. छटपूजा कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समितीचे अध्यक्ष ललन यादव, उपाध्यक्ष मनोहर सहानी, कार्याध्यक्ष चंदन सहानी, कोषाध्यक्ष राजेश विश्वकर्मा, सचिव यशवंत मिश्रा, सहसचिव राजेश सहानी, अखिलेश उपाध्याय, प्रकाश यादव, राकेश सहानी, नीरज सिंह, संजय निषाद, आमरीश यादव आदी समितीचे पदाधिकारी व समाजबांधवांनी सहकार्य केले. पूजेनंतर घाटाची स्वच्छता मेहरुण तलाव येथे छटपूजा कार्यक्रम सोमवारी सकाळी झाल्यानंतर समितीतर्फे गणेश घाटावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. घाटावर पुजेसाठी आलेल्या भाविकांकडून निर्माल्य, फुल व अन्य कचरा तलावात जावू नये, यासाठी समितीच्या सदस्यांनी दखल घेत कार्यक्रमानंतर लगेच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.