Chicken shop : ‘गाव तिथे चिकन सेंटर’च्या माध्यमातून रोजगार निर्मीती; वर्षाला होतेय मोठी आर्थिक उलाढाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chicken shop

Chicken shop : ‘गाव तिथे चिकन सेंटर’च्या माध्यमातून रोजगार निर्मीती; वर्षाला होतेय मोठी आर्थिक उलाढाल

देवळा : कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी मांसाहाराला पसंती दिल्याने लहानमोठ्या प्रत्येक गावाच्या बाजूला कोंबडीच्या (ब्रॉयलर) मटणाचे दुकान आले आहे. यामुळे ‘गाव तिथे चिकन सेंटर’ असे चित्र दिसून येत आहे. खाणाऱ्यांची सोय आणि एक नवीन रोजगार निर्माण झाल्याने यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते.

कोरोनाकाळात आपली प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी अनेकांनी मांसाहार करायला सुरवात केली. डॉक्टरांनी पण प्रथिनयुक्त आहार घेण्याचा आग्रह केल्याने बरीचशी मंडळी तेव्हापासून अंडी, चिकन, मटणावर ताव मारू लागली आहेत. यामुळे मांसाहार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मासे तसेच बोकडाच्या मटणाचे दर जास्त असल्याने ते सर्वसामान्यांना परवडत नाही. म्हणून बहुतांश मध्यमवर्गीय व मजुरी करणारे अनेकजण चिकनला म्हणजे ब्रॉयलर कोंबडीलाच पसंती देतात.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

चिकनचे दर साधारणतः सरासरी २०० ते २४० रुपये प्रतिकिलो असतात अन्‌ हे परवडणारे असल्याने चिकन खाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आता प्रत्येक गावालगत एकतरी चिकन सेंटर असतेच. सोमवार, एकादशी असे काही वार व दिवस वगळता इतर दिवशी चिकनला चांगली मागणी असते. सध्या शेतीकामांना वेग आल्याने मजुरांजवळ पैशांची उपलब्धता आहे. थंडीच्या दिवसात अंडी- चिकन खाणे शरीराला उष्णता देणारे असल्याने बहुतेक शेतकरी आणि शेतमजूरही चिकनलाच पसंती देतात.

हेही वाचा: Gynecomastia : जगातील एकतृतीयांश पुरुष स्तनांच्या अप्रमाणित वाढेने त्रस्त; जाणून घ्या याची कारणे

''मटणाचे भाव ६०० रुपये किलोच्या वर असल्याने ते घेणे परवडत नाही. तसेच, लहानमोठ्या सर्वांनाच भाजी- बिर्याणीसाठी चिकन आवडते. त्यामुळे चिकनला वाढती मागणी आहे. या पार्श्‍वभूमीवर जवळपास प्रत्येक गावात चिकन सेंटर उपलब्ध झाले आहे.'' - विलास महाले, देवळा

हेही वाचा: Viral News: मृत बाळाला तोंडात घेऊन रुग्णालयात फिरत होता कुत्रा!

टॅग्स :NashikChicken