Gynecomastia : जगातील एकतृतीयांश पुरुष स्तनांच्या अप्रमाणित वाढेने त्रस्त; जाणून घ्या याची कारणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gynecomastia

Gynecomastia : जगातील एकतृतीयांश पुरुष स्तनांच्या अप्रमाणित वाढेने त्रस्त; जाणून घ्या याची कारणे

Gynecomastia : गायनेकॉमास्टिया ही एक अशी स्थिती आहे ज्यामुळे जगातील एकूण पुरुष समुदायांपैकी जवळपास एकतृतीयांशपेक्षा जास्त लोक त्रस्त आहेत. यामुळे पुरुषांना लज्जास्पद वाटते व आत्मविश्‍वास कमी होतो. याविषयीची महत्त्वपुर्ण माहिती आपण डॉ. मनोज बच्छाव यांच्याकडून जाणून घेऊया.

गायनेकॉमास्टिया सर्जरी कोणासाठी?

ज्या पुरुषांना सार्वजनिक ठिकाणी स्वत:चा शर्ट काढताना आपल्या छातीमुळे अस्वस्थ वाटत असल्यास आपण प्लास्टिक सर्जनला कन्सल्ट करून घेणे उचित राहील.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

गायनेकॉमास्टियाची कारणे

गायनेकॉमास्टिया : साधारणपणे हार्मोन्स एस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉनच्या असमतोलामुळे होतो. काही औषधांमुळे गायनेकॉमास्टिया होऊ शकतो.

आनुवंशिक कारणे : आपल्या घरात बाकी पुरुषांना हा असल्यास आपल्याला होण्याची जास्त शक्यता असते. गायनेकॉमास्टिया कोणत्याही वयात होऊ शकतो.

हेही वाचा: Smelly Shoes : बुटांची दुर्गंधी येते? ट्राय करा या ट्रिक्स

या शस्त्रक्रियेत काय केले जाते?

या शस्त्रक्रियेत पुरुषांच्या स्तनातील चरबी काढून टाकली जाते. इतर पद्धतीमध्ये शस्त्रक्रिया लायपोसक्शन सहाय्यित

मास्टेक्टोमीद्वारे त्वचेखालील स्तनदेखील काढले जातात. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांचा आत्मविश्‍वास वाढतो. अतिरिक्त चरबी काढल्यामुळे छाती पूर्णपणे सपाट दिसते. लायपोसक्शनसोबत केस प्रत्यारोपण, स्तनावरील शस्त्रक्रिया, तसेच इतर कॉस्मेटिक सर्जरीज बजाज फायनान्सच्या अर्थसहाय्यामुळे शून्य टक्के व्याजदरावर सुलभ हप्त्यांवर उपलब्ध आहे.

डॉ. मनोज बच्छाव हे नामांकित प्लास्टिक सर्जन असून, त्यांचे M.Ch. सुपर स्पेशलायझेशन के.ई.एम. हॉस्पिटलमधून झाले आहे. त्यांना वसुधन अर्जीन लेझर फेलोशिप- असोसिएशन ऑफ प्लास्टिक सर्जरी ऑफ इंडिया यांच्याकडून प्रदान करण्यात आलेली आहे.

हेही वाचा: Open Pores Remedies: ओपन पोर्सने त्रस्त आहात? या उपायांनी मिळवा घरबसल्या सुटका

टॅग्स :Nashiklifestylehealth