tribal area
sakal
किरण कवडे- नाशिक: पोटच्या पोरांना दत्तक देणाऱ्या बापाच्या नावे तब्बल २० एकर जमीन आहे. मात्र, केवळ व्यसनाधिनता व कष्ट न करण्याच्या वृत्तीतून टाके देवगाव येथील हंडोगे कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली. त्यातून पर्यायी मार्ग म्हणून ओळखीच्या व्यक्तींनाच आपले मूल दत्तक देऊन जबाबदारीतून मोकळे होण्याची त्यांनी शक्कल लढवली. दरम्यान, या प्रकरणी महिला व बालकल्याण समितीने दिलेला अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द झाल्याने त्यातही याच गोष्टी नमूद असल्याचे सांगण्यात येते.