नाशिक : मोसम नदीपात्रात बुडून बालकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Child dies after drowning in river Nashik News

नाशिक : मोसम नदीपात्रात बुडून बालकाचा मृत्यू

वडेल (जि. नाशिक) : अजंग (ता. मालेगाव) येथील वीटभट्टीजवळील मोसम नदीपात्रात असलेल्या बंधाऱ्यामध्ये मित्रांसमवेत पोहण्यासाठी (Swim) गेलेल्या तेरा वर्षीय चंद्रकांत पवार या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १७) दुपारी चारच्या सुमारास घडली. चंद्रकांत हा संजय पवार यांचा एकुलता एक मुलगा असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

अजंग येथील संजय पवार हे पत्नी व मुलगा, मुलगी वास्तव्यास आहेत. आई- वडील कामाला गेले असताना चंद्रकांत हा मित्रांसोबत मोसम नदीपात्रात पोहण्यासाठी गेला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. चंद्रकांत बुडत असल्याचे पाहून मित्रांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. एकुलत्या एक मुलाचा बुडून मृत्यू झाल्याचे कळताच आई- वडिलांनी हंबरडा फोडला. मालेगाव सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. वडनेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: Crime Alert | शहरात घरफोड्यांची 'हॅटट्रीक'

चंद्रकांतची यात्रा ठरली अखेरची

शनिवारीच सप्तश्रृंगगडावरून (Saptashrung Gad) पायी यात्रा करून परतलेल्या चंद्रकांतने रविवारी दुपारी मित्रांसमवेत मोसम नदीवरील बंधाऱ्‍यात पोहायला जाण्याचा निर्णय घेतला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याने चंद्रकांतची यात्रा अखेरची ठरली.

हेही वाचा: नाशिक : गांधी तलावात 16 वर्षीय मुलगा बुडाला

Web Title: Child Dies After Drowning In River Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top