Child Marriage
sakal
नाशिक: बालविवाहाविषयी जाणीव व जागृती करण्यासाठी तसेच बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हा कृती समितीने आराखडा तयार केला आहे. बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीसह आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केल्या. तसेच, गर्भलिंग निदानास पायबंद घालण्यासाठी सोनोग्राफी सेंटर्सची नियमित तपासणीचे निर्देशही त्यांनी दिले.