नाशिक- नाशिक रोड परिसरातील लॉन्सवर गेल्या महिन्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याला फाटा देत विवाह लावण्यात आला. या प्रकरणाची माहिती मिळताच बालविवाह प्रतिबंधक समितीने दिलेल्या तक्रारीनुसार, दोन्ही कुटुंबीयांसह लॉन्समालक व विवाह लावून देणाऱ्या भटजीविरोधात उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.